(शिर्डी प्रतिनिधी )-श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र अशा शिर्डी शहरांमध्ये पाकीटमारीने मोठा कहर केला होता ,अशा पाकीटमारी टोळीचा स्वतःला मोरक्या समजणारा ,साईभक्तांच्या पैशाच्या जीवावर, पाकीट मारी वर स्वतःला मोठा गुंड समजणारा चिंधीचोर पाप्या शेख पुणे येरोडा कारागृहात गेल्या तीन वर्षापासून कारावास भोगत आहे, गोरगरीब व साईभक्त यांना विविध प्रकारांनी लुबाडून स्वतःला मोठा गुंड समजणारा चिंधीचोर पाप्या शेख सध्या
तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्याला शिक्षा लागून तीन वर्षे पूर्ण झाले आहे, श्री साईंच्या नगरीत अती करणाऱ्यावर श्री साईबाबांचा दंड फिरल्या शिवाय राहत नाही व तो फिरला व त्या चीच सजा तो भोगत आहे, असे शिर्डीकरांमधून सध्या बोलले जात आहे,
शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे, येथे देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्त श्री साई दर्शनासाठी येत असतात, त्याचाच फायदा चिंधीचोर पाप्या शेख याने घेऊन येथे पाकीटमारी सुरू केली, हळूहळू पाकीटमारां च्या टोळ्या बनवल्या, यां टोळ्याचा हळूहळू विस्तार होत गेला देश-विदेशातून आलेल्या साईभक्तांची पाकिटे मारून, फुकटची कमाई करून दारू गांजा पिऊन मौजमजा करणे ,दादागिरी, मारामाऱ्या गुंडगिरी करणे शिर्डीत सुरू झाले, शिर्डी धार्मिक क्षेत्र असतानाही येथे मोठ्या प्रमाणात साईभक्तांची पाकीटमारी सुरू झाली,, महिलांचे दागिने ओरबाडणे, मोटरसायकलींची चोरी या हरामाची कमाई मोठ्या प्रमाणात मिळू लागली, त्यातूनच शिर्डीत हाणामाऱ्या, दादागिरी ,गुंडगिरी ,खून असे प्रकार वाढले, अवैध व्यवसायाला मोठा ऊत आला होता , शिर्डीचे नाव त्यामुळे हळूहळू बदनाम होऊ लागले, चिंधीचोर पाप्या शेख व त्याच्या टोळीने शिर्डीत अनेक गुन्हे केले ,परंतु चिरीमिरी च्या जोरावर ते दाबले गेले, त्यामुळे चिंधीचोर पाप्याचा माज आणखी वाढत गेला ,त्याने शिर्डीतील रचित सुदेश पाटणी व प्रवीण विलास गोंदकर या दोन शिर्डीतील तरुणांचा निर्घुण खून केला व फरार झाला, त्यावेळी शिर्डीचे दैनिक साईदर्शन ने त्या विरोधात मोठा आवाज उठवला, त्यामुळे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाही चिंधीचोर पाप्या शेख ने योजना आखून जितेश लोकचंदानी यांचाही खून करण्याची तयारी केली होती, मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानी व त्यांच्या पोलीस पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकून चिंधीचोर पाप्याचा तपास लावला व त्याला अटक केली त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने व त्यात शिर्डीतील ह्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा केल्याने चिंधीचोर पाप्या शेख यास जन्मठेप शिक्षा सुनावली गेली व चिंधीचोर पाप्या शेख आज पुणे येथील येरोडा मध्यवर्ती कारागृहात नरक यातना भोगत आहे, चिंधीचोर पाप्या शेख आपल्या दोन नंबर कमाईवर, चिरीमिरी च्या जोरावर गुंडगिरी, दादागिरी च्या जोरावर कोणालाही काही समजत नव्हता, मात्र श्री साईबाबाचा दंड्या एक दिवस फिरत असतो व श्री साईबाबांचा दंड्या चिंधीचोर पाप्या शेख वर फिरला गेला व आज तो गेल्या तीन वर्षापासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, श्री साईबाबांनी आपल्या साईभक्तांची पाकिटे मारणाऱ्यायाला धडा शिकवला आहे, असे शिर्डीकर बोलताहेत.
Post a Comment