शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )लॉकडाऊनमुळे सर्वजन घरात असतांना व कडक उन्हामुळे हैराण झालेले असतांना राहता तालुक्यातील काही भागात काल सायंकाळी अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे परिसरात अनेक वृक्ष पडली फांद्या पडल्या काही ठिकाणी छ परावरील पत्रे उडाली काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे मात्र सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही मात्र बराच वेळ वीज गायप झाली होती व काही गावात अंधारात रात्रभर लोकांना राहावे लागले काही दिवस असाच गडगडाटासह वादळी पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे आधीच लॉक डाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले असतांना या वादळी पावसाने आजून त्यात भर पडू नये अशीच प्रार्थाना या परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.

Post a Comment