शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) शासनाने अटी व शर्ती टाकून परवानगी दिल्याने लॉक डाऊनचा तिसराताप्पा सुरु झाल्यानंतर परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबासह आपला कामाधंदा सोडून जात आहेत प्रशासनाने त्यांना जाण्यासाठी विविध ठिकाणाहून सरकारी बसेस व श्रमिक रेल्वे सोडल्या असल्यातरी या बस व रेल्वे मध्ये शोषलं डिस्टन्स पाळला जात असल्याने प्रवासी नेहमीपेक्षा कमी प्रमाणात जात आहेत त्यामुळे अनेक लोकांची इच्छा असूनही आहे त्या ठिकाणी नाईलाजास्तव राहावे लागत आहे अनेकांनी ग्रामपंचायतचे व नगरपंचायतचे आरोग्य दाखले काढले आहेत परंतु आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत आवश्यक वस्तूची ने आन करण्यार्या वाहनांमध्ये कोणी घेत नाहीत त्यामुळे अशे परप्रांतीय लोक पायीच जातांना दिसत आहेत.

Post a Comment