शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) लॉक डाऊन सुरु होऊन ५० दिवस होत आहे सर्वजण घरात बसून आहेत सर्व व्यवसाय बंद असून अंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीतही सर्व शांत शांत आहे शिर्डी व परिसरातील फुल शेती धोक्यात आली आहे अनेकांनी फुलबागा तोडल्या आहेत तर काही दररोज फुले सस्त्यावर बांधावर फेकून देत आहेत त्यामुळे शिर्डी व परिसरातील बागकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे शिर्डीत साईबाबांना मोठ मोठे पुष्पहार पुष्पगुच्छ मोठया श्रद्देने साईभक्त अर्पण करीत असतात पण सध्या साईबाबा मंदिर बंद आहे फुलांचा दररोज भरणारा बाजारही बंद आहे शिर्डी येथून राज्य व परराज्यात दररोज फुल्ल बसने जातात तेही बंद झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिर्डी व परिसरातील फुलबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत फुलबागात गुलाब गलांडा गुलछडी झेंडू आदी येथे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते सध्या बंद असल्याने आर्थिक उलाढाल पूर्णतः बंद झाले आहे त्या मुळे फुलबागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

Post a Comment