कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी वाईन शॉप बंद करून केली कारवाई परवाना रद्द होण्याची मागणी.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा/  राजेंद्र गडकरी
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दारूबंदी केली होती ,मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू बंदी उठविण्यात आली, त्यामुळे राहता येथील प्रसाद वाईन्स  मध्ये मद्य घेणाऱ्यांसाठी मोठी गर्दी झाली, 400 ते 500 लोकांचा जमावला या वाईन्स मालकाने  आपल्या मालकीच्या साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्वांची बसण्याची व्यवस्था केली, जमाव बंदी आदेश असतानाही या लॉन्स मध्ये हे लोक  एकत्रित बसली लॉकडाउनच्या काळात कोणतेही लॉन्स, मंगल कार्यालय उघडण्यास बंदी असताना या लॉन्सचा उपयोग वाईन शॉप साठी  करण्यात आला त्याच प्रमाणे या प्रसाद वाइन्स मालकाने व राहता नगरपालिकेची बॅरिकेट्स लावण्यासाठी  परवानगी ही घेण्यात आली नाही  बॅरिकेट्स रोडवर  लावणे चुकीचे असताना येथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते, त्याचप्रमाणे कोणतेही फलक सूचना न दिल्याने नियमाचे उलंघन केल्याने   बिंदास न्यूज  व जनमत मराठी न्यूजच्या बातमीत दाखवले. कर्तव्यदक्ष अधिकारी  तहसीलदार कुंदन हिरे व पोलिस उपविभागीय अधिकारी  सोमनाथ वाघचौरे यांनी लक्ष देऊन हे वाईन शॉप बंद केले व या प्रसाद वाईन्स मालकावर विविध गुन्हे दाखल केले आहेत, अधिक तपास पोलीस निरीक्षक  करत आहेत, या प्रसाद वाईनचे परवानाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी  होत आहे ,या काळात जमावबंदी आदेश असतानाही लोक जमा करणे, लॉकडाउनचे नियम न पाळणे या सर्वांमुळे राहता शहर व परिसरात आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन  अश्या घटना परत घडू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे  ह्या पुढे अशे प्रकार कोणी करीत असेल व नियमाचे पालन करणार नसेल तर त्यावरही गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कुंदन हिरे व  उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले त्यामुळे सर्वांनी नियमाचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget