शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )साईबाबांच्याभूमीत चालत असलेले अवैद्य व्यवसाय बंद होत नाही येथे मोठा पोलीस फौज फाटा असतांना व लोकडाऊन मध्ये जिल्हा बंदी असतांना गांजा सापडला जातो अवैद्यरित्या दारू पकडली जाते हे सर्व इतकी कडक पहारा असतांना शिर्डीत हा माल येतेच कशे असा प्रश्न निर्माण होत आहे गांजा चरस अफिम दारू वेश्याव्यवसाय पाकिटमारी गुन्हेगारी विरोधात अनेकदा शिर्डीतील सामाजिक संस्था समाजसेवक व ग्रामस्थानीं अनेकदा आंदोलने केली आहे अनेकदा उपोषणे झाली तरीही शिर्डीतील अवैद्य व्यवसाय सुरूच आहेत तेही लोकडाऊनच्या काळात त्यामुळे पाणी कुठं मुरतंय हे आजून गुलदस्त्यात आहे ह्या सर्व अवैद्य वस्तूंची वाहतूक होतीच कशी तसेस या अवैद्य धंद्यांची पोलीस पत्रकारपरिषदेत सांगतात कि अवैद्य धंदे चालू असलेतर कळवा काळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल मग अनेकदा कळविणाऱ्यांचे नाव कसे बाहेर येतात अवैद्य धंदे दारूधंद्यावाल्यांना छाप्या अगोदर कशी व कोण खबर देतो त्याची चोकशी घेणे गरजेचे आहे शिर्डी व परिसरात अवैध दारू गांजा वैश्यव्यवसाय लोकडाऊनकाळांत सर्व बंद असतांना चालतो तर मग पोलीस काय करीत आहेत पोलिसांनी ठरवले तर मंदिरा समोरून चप्पल सुद्धा चोरी जाऊ शकत नाही. असा सवाल शिर्डीकर करत असून सर्वात मोठं असणाऱ्या अहमदनगर जिल्यात आंतराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र शिर्डीत चालणाऱ्या या धंद्याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस आधीक्षक अखीलेशकुमार सिंग यांचीही जबाबदारी मोठी वाढली आहे त्यांनीच आता शिर्डीतील व परिसरातील अवैध धंद्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे व गुप्त चौकशी करून अवैध धंद्यांवर धाडी टाकणे गरजेचे आहे अशी परिसरातुन मागणी होत आहे.

Post a Comment