शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लोकडाऊन सुरु असून या आपत्तीजनक परिस्तिथीत गोरगरीब सर्व सामान्य कुटुंबांना कामधंदे नसल्याने पोटाचा प्रश्न पडत आहे राज्याचे माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजने अंतर्गत गोरगरिबांना पाच रुपयात भोजन पाकिटे देण्यात येत असून या योजनेचा सावळीविहीर बु तालुका राहता येथे आज रविवार पासून शुभारंभ करण्यात आले सावळीविहीर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून लाभार्थींना उभे करत शोषलं डिस्टन्स पाळत या भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले यावेळी राहाता कु उ बा समितीचे संचालक बाळासाहेब जपे सरपंच रुपाली आगलावे शिवाजी आगलावे गणेश आगलावे शांताराम आगलावे ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्तिथ होते यावेळी लोकडाऊनच्या नियमाचे पालन करून भोजन पाकीट वाटण्यात आले आहे नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७०० गरजवंतांना हि पाकिटे देण्यात आली या एका पाकिटामध्ये लापशी व खिचडी होती यावेळी येथे चोख नियोजन ठेवण्यात आले होते या योजनेमुळे गावातील गरजवंत व रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या काही परप्रांतीय मजुरांनाही कार्यकर्त्यांनी हि अन्न पाकिटे कार्यकर्त्यांनी स्वतः घेऊन मोफत वाटली हि योजना दररोज राज्यात लोवकडाऊ असे पर्यंत सुरु राहणार आहे सर्वांनी अन्न पाकिटे घेतांना सोशल डिस्टन्स पाळावे मास्क लावावे गर्दी करू नये असे आव्हान यावेळियावेळी करण्यात येत होते.
Post a Comment