शिर्डी लगतच्या निमगाव कोर्राळे गावात ११मे रोजी पहाटे ४वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थान च्या भोजनालयात काम करत असलेल्या भागवत दामोधर साळवे यांची होंडा शाईन एम एच १७सी बी २११४व नातेवाईक संखाराम गोविंद विर यांची बजाज डिस्कव्हर एम एच १७ अॆ एच ५८३४व हिरो होंडा एम एच १७वाय६०२२अशा जवळपास एक लाख रुपये किंमतीच्या दुचाकी पेट्रोल टाकून कोणीतरी खोडसाळ पणे पेटवून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे
एक महिन्यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांची नवी कोरी कार पेटवून देण्यात आली होती अजुन या आरोपींचा शिर्डी पोलीसांना तक्रार दाखल करुन हि तपास लावण्यात यश आले नसताना संचारबंदी व लाॅकडाउन सुरू असताना अडचणी मध्ये आलेल्या रोजंदारीवर काम करत असलेल्या साळवे यांच्या सह नातेवाईक लोकांच्या दुचाकी पेटवून देणारया आरोपींचा शिर्डी पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी भागवत साळवे यांनी. शिर्डी पोलीसात दिलेल्या तक्रारीत केली या घटनास्थळी शिर्डी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे या कुटुंबातील लोकांना आधार देण्यासाठी संरपच शिल्पा कातोरे उपसरपंचअजय जगताप माजी उपसरपंच विजय कातोरे सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे चेअरमन राजेंद्र गाडेकर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कातोरे माजी सदस्य धनंजय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तलाठी भाऊसाहेब मांढरे ग्रामविकास अधिकारी आर के गायकवाड हजर होते तीन दुचाकी पेटवून नुकसान करणारा जो कोणी संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून असा प्रकार करत असेल अशाच शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे यांनी केली आहे.
Post a Comment