शिर्डी (जय शर्मा )-सध्या कोरोणामुळे देशात जगात अनेक रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत ,अनेकांना राज्यात जिल्ह्यात रक्ताची मोठी गरज भासू लागली आहे, अशा परिस्थितीत रक्तदान करणे, सर्वात श्रेष्ठ दान समजले जात आहे ,त्यामुळेच शिर्डीतील समाजसेवेत अग्रेसर सहाणारे समाज बांधवांच्या वतीने सिंधी समाजातील समाजसेवकांनी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान च्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले ,
शिर्डीत श्री साईबाबा संस्थान ची रक्तपेढी असून येथे हे लॉक डाऊन पूर्वी साईभक्तांनी रक्तदान करावे , इतर दाना बरोबरच रक्तदान श्रेष्ठ असल्याचे विविध ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत ,लॉकडाउन पूर्वी शिर्डीत मोठी गर्दी होती, मोठ्या संख्येनेसंख्येने साईभक्त येऊन रक्तदान करत होते, मात्र लॉक डाऊन मुळे गेल्या 17 मार्च पासून शिर्डीत साईभक्त येणे बंद झाले आहे त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे ,त्यामुळेच नेहमी रक्तदान करणारे शिर्डीतील सिंधी समाजातील बांधव यांनी दिनांक 23 /5/ 2020 रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चा रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले, नित्य साई सेवा व सिंधी समाज मित्र मंडळातील सनी रोहरा, मनोज मोटवानी, सुनील तोलानी, रोहन तोलानी मनोज रामचंदानी सजंय फुदंवानी ,यांनी रक्तदान केले तसेच राजेश टिकीयानी यांनी मोलाचे सहकार्य केले, या सर्वांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment