(राहाता प्रतिनिधी मसूद मुस्ताक शाह ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून शासनाने देशात लॉकडाऊन सुरू केला आहे, अशा लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना रमजानचा पवित्र सण आला आहे ,आज शेवटचा पवित्र रोजा असून उद्या पवित्र रमजान ईद आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात राहूनच नमाज अदा करावी व देशाला ,जगाला या कोरोणा महामारी पासून वाचवावे अशी अल्लाला प्रार्थना करावी ,असे आवाहन मुस्लिम समाजातील समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शहा यांनी केले आहे.जगात, देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे, सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , सर्व काम धंदे बंद आहेत, लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू झाला आहे, या लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात काही वेळेत काही दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे , तसेच जिल्हा अंतर्गत अटी व शर्ती ठेवून प्रवासही करता येत आहे, मात्र संचारबंदी 31 मेपर्यंत जारी आहे , तसेच कोरोणा महामारी चा संसर्गाचा धोका ही अद्याप टळलेला नाही , जरी राहाता तालुका कोरोणा मुक्त असला तरी कोरानाचा धोका भविष्यातही टाळणे गरजेचे आहे, या लॉकडाउनच्या काळातच हा पवित्र रमजान महिना आला आहे, त्यामुळे महिनाभर सर्व मुस्लिम बांधवांनी स्वच्छेने तसेच शासनाचे ,व लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात नमाज अदा केली , आज रमजानचा पवित्र शेवटचा रोजाअसुन यासंदर्भात ,समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शाह यांनीपुढे।सागितले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण अाहे, पण शंभर वर्षानंतर प्रथमच सामूहिकपणे नमाज न करता या दिवशी प्रत्येकाला घरात राहून नमाजअदा करावी लागत आहे, मात्र, प्रत्येकाचे जीवन, कुटुंब राज्य, देश महत्त्वाचा असून कोरोणा यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाज अदा करावी व व फोनवरूनच एकमेकांना ईद शुभे्छा द्याव्यात ,तसेच या महामारी पासून सर्वांना वाचवण्याचे अल्लाला साकडे घालावे ,असे आवाहनही राहाता येथील समाजसेवक इलियास शहा व मे मुस्ताक शहा यांनी यावेळी केलेआहे.
Post a Comment