श्रीरामपूर -तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे रात्री गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लोटीवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
Post a Comment