राहता व कोपरगाव परिसरात महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- नगर मनमाड महामार्गावर व इतर ठिकाणी रस्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने नुकतीच अटक केली असून  त्यांच्याकडून तीन मोटारसायकली व एअरगन हस्तगत करण्यात आली आहे,     यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,नगर-मनमाड महामार्गावर तसेच पुणतांबा चौफुली व इतर ठिकाणी पहाटेच्यावेळी वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती, या टोळीने दिनांक 17 मे रोजी पहाटे ४,१५वा, लालजी तोमर हे मध्य प्रदेश येथून आपल्या एम, एच, 15/ ई,जी 47 17 या ट्रकमध्ये गहू घेऊन कोपरगाव औद्योगिक वसाहत येथे  येत असताना पुणतांबा चौफुलीजवळ गोदावरी शीड फॉर्म जवळ पत्ता विचारण्यासाठी थांबल्यावर अचानक मागून दोन विना नंबर मोटरसायकलीवर  सहा जणांनी येऊन या ट्रकच्या केबिनमध्ये घुसून ट्रकचालक व दोन साथीदारांना मारहाण करून त्यांच्याकडील 56000 रोख रक्कम लुटून नेली ,त्याच दिवशी दिनांक 17 मे रोजी पहाटे पाच वाजता वैभव फुला वाघ हे वर टेंबे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून आपल्या पिकअप गाडीत कोथिंबीर घेऊन सोलापूर येथे विकण्यासाठी गेले होते तेथून कोथंबीर विकून ते परत सोलापूरहून  आपल्या पिअकप गाडी नंबर एम, एच 41 /ए,जी 26 17 या वाहनातून परत आपल्या घरी वरचेटेंबे,ता, सटाणा येथे येत असताना पुणतांबा चौफुलीवर अचानक पाठीमागून दोन विना नंबरच्या मोटरसायकलवरून चार जण येऊन त्यांनीही पिअकप गाडी थांबून पिकअप मधील चालक व मालक यांना  मारहाण करून त्यांच्याकडील 35000 रुपये रोख काढून घेऊन पोबारा केला, या दोन्ही गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 21 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी असे असिफखान सरदारखान हे आपल्या साथीदारांसह आपली ट्रकMH41/AU/1301 यामध्ये कराड येथून साखर भरून मालेगाव येथे जात असताना निर्मळ पिंप्री शिवारात दोन विना नंबरच्या पल्सर गाड्यांवर चौघे जण पाठीमागावुन व गाडीअडवुन व, थांबवुन  केबिनमध्ये घुसून चालक व  ट्रकमधल्या साथीदारांना मारहाण करून ट्रक चालकाकडून एक लाख 12 हजार रोख व 5000 रुपयाचा मोबाईल चोरून नेला, या घटनेची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आली, या तिन्ही घटने मुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीहोती, लॉक डाऊन काळात ज्या घटना घडल्या, या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सोपवल्या नंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पोलीस कर्मचारी पथकाने विविध पथके निर्माण करून विविध ठिकाणी या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा तपास लावण्यासाठी विविध ठिकाणी पाठवल्या, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा शोध घेण्यात पोलिसांनी अहोरात्र मोठे परिश्रम घेतले, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीत अरिफ गफुर शेख, वय 25 रा, अवघड पिंपरी तालुका, राहता व सागर गोरख मांजरे 24 मातापुर ता, श्रीरामपूर या  आरोपींसह  त्यांचे इतर साथीदार या टोळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना समजले, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी  आरिफ शेख व सागर मांजरे यांना ताब्यात घेऊन त्यांचे साथीदार अविनाश श्रीधर साळवे वय 22 राहणार राहुरी ,सुखदेव गोरख मोरे ,वय २३राहणार पिंपळवाडी ,ता, राहाता,चेतन राजेंद्र सणाचे वय १९रा, पिंपळवाडी तालुका राहता, अक्षय सुदाम माळी वय22 राहणार खंडोबा गल्ली ,तालुका राहाता, अक्षय सुरेश कुलथे राहणार राहुरी, सागर पोपट  हरिचंद्रे,वय२२ राहणार राहुरी व एक अल्पवयीन मुलगा यांना विविध ठिकाणाहून पाठलागकरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे, या सर्व आरोपींकडून 120000 च्या दोन विनानंबरच्या पल्सर व तीस हजाराची एक मोटरसायकल तसेच २०००रु,ची एअरगनअसा  एकूण 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, हे सर्व आरोपी राहुरी येथे रात्रीएकत्र येत, त्यानंतर ते पिंपळवाडी तालुका राहता येथे सुखदेव गोरख मोरे यांच्या घरी किंवा शेतात थांबत असत, त्यानंतर पहाटे तीन वाजता तीन मोटरसायकलीवर तीन तीन आरोपी बसुन महामार्गावर किंवा रस्त्यावर वाहनांची रेकी करण्यासाठी येत, दोन मोटरसायकलवरील सहा आरोपी  हे वाहनांचा पाठलाग करून, अडवून त्यांना लुटत व एका मोटरसायकलवरील तीन आरोपी हे इतर वाहने व पोलिसांची वाहने येतात, जातात यावर पाहणी करत व एकमेकांना मेसेज देत असत ,अशा या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली असून या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या तपास कामी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शन व सूचनांवरून पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि सागर पाटील, शिशिरकुमार देशमुख नाणेकर, , मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे , रवींद्र कर्डिले संतोष लोंढे दीपक शिंदे रवी सोनटक्के ,विशाल दळवी राहुल सोळंकी रंजीत जाधव, सागर सुलाने, प्रकाश वाघ, सागर ससाणे, चालक संभाजी कोतकर सचिन कोळेकर आदींनी मोठे परिश्रम घेतले, अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget