श्रीरामपूर (प्रतिनिधी )- करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्व धार्मिक उत्सव घरामध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागात संचलन करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. करोना विरोधात अहोरात्र लढा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून स्वागत केले.करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस मेहनत घेत आहे. धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने संयम बाळगून रमजानमध्ये पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करत रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी संचलन केले.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सींह यांनी सर्व पोलुस बांधवांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली सर्वांची आरोग्य तपासणी झाली का पोलीसांना वेळेवर औषधे सँनिटायझर व ईतर सामुग्री वेळेवर दिली जाती का याचीही बारकाईने चौकशी केली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पासुन निघालेले पोलीसांचे पथ संचलन वार्ड नंबर दोन मधुन पुन्हा पोलीस स्टेशनला आले या संचलनात अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मँडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीसांची आस्थेने चौकशी केल्यामुळे पोलीसांना एक वेगळीच उर्जा मिळाली.

Post a Comment