राहता (शाह मुस्ताक आली )-अहमदनगर जिल्ह्यात राहाता शहरात लॉक डाउन च्या काळात गेल्या काही दिवसापासून शहरातून मुली फरार होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या आठ-दहा दिवसात शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे, या घटनेमुळे राहता शहरात उलट-सुलट चर्चा होत असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे,कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू असून राहता शहरात सर्व बंद आहे, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहे, किराणा,भाजीपाला,मेडीकल, घेण्यासाठी तसा बहाणा करुन किंवा काही मुली बाहेर येतात, खरेदीच्या निमित्ताने बाहेर फिरतात व त्याचा फायदा घेत येथून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे, राहता शहरातून गेल्या आठ दहा दिवसात तीन मुली फरार झाल्याचे समजते, याची शहरात कुजबुज सुरू आहे, लॉक डाऊन मुळे सर्व जण घरात असल्याने याचे जास्त वाच्यता होत नाही, शिवाय यासंदर्भात जाहीर बोलायला कोणी तयार नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे, या मुली बेपत्ता होण्यामागे कोणाचा हात आहे का। किंवा स्वतःहून या मुली गायब होत आहे किंवा यामागे नेमकी ,कोण आहे का।याचा तपास लावणे गरजेचे आहे, सध्या देश संकटातून जात असताना शहरात असे प्रकार वाढत असेल तर याला वेळीच आळा घातला जाणे गरजेचे आहे, असे राहता मधून आता बोलले जात आहे, मुली बेपत्ता होण्याचे असे शहरात प्रकार यापुढे वाढत राहिले तर शहरात मोठी समस्या निर्माण होणार आहे या दबक्या आवाजात शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे अनेक कुटुंबात मुलींचे आई-वडील मोठे चिंतेत पडले आहे ,यामागे नेमकी काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे ,असे आता नागरिक बोलत आहेत.
Post a Comment