शिर्डी (राजेंद्र गडकरी)- देशात सन2018 पासून केंद्र शासनाच्यावतीने देशातील शहरांमधील स्वच्छता ,कचरा मुक्तीअभियान,नालेसफाई,वेस्टेज व्यवस्थापन आणि इतर स्वच्छता, सुंदरता पाहून शहरांचं रेटिंग ठरविण्यात येत असतं, दरवर्षी या गोष्टीत चांगले काम करणाऱ्यांना तसे रेटिंग शहराला दिलं जात असतं, यावर्षी शहरातील स्टार रेटिंग देशातील विविध शहरांची निरीक्षण करून जाहीर करण्यात आली आहेत , केंद्रीय नगर विकास मंत्री हारदिपसिंग पुरी यांनी नुकतीच देशातील या बाबत असणाऱ्या स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, या स्टार रेटिंग मध्ये महाराष्ट्रातील व देशातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यामुळे शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तामधून मोठा आनंद व्यक्त होत आहे,भारताचे नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच देशातील स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, देशातील शहरांमधील स्वच्छता सुंदरता नाला सफाई, वेस्ट मॅनेजमेंट, प्लास्टिक वापरावर निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून शहराची केद्रींय पथकामार्फत पाहणी करून केंद्राला अहवाल देऊन त्यावर निर्णय घेण्यात येतो, यावर्षी देशातील अनेक शहरांचे निरीक्षण करून केंद्राला अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच हे या संदर्भातील स्टार रेटिंग घोषित केले आहे ,यावर्षी देशातील स्टार रेटिंग शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यात स्टार रेटिंग मध्ये फाइव स्टार रेटिंग अंबिकापुर ,राजकोट सुरत ,मैसूर ,इंदोर आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई या शहरांनी मिळवला आहे, तर ठाणे भिवंडी अंबरनाथ आणि मीरा भाईंदर या शहरांना शिर्डी प्रमाणित थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे ,त्याचप्रमाणे धुळे-जळगाव माथेरान ,रत्नागिरी ,पाचगणी, वेंगुरला ,आणि जेजुरी या शहरांनाही थ्रीस्टार देण्यात आले आहेत, शिर्डीला थ्रीस्टार रेटिंग मिळाल्यामुळे शिर्डीत मोठा आनंद व्यक्त होत आहे ,शिर्डी हे छोटे शहर असले तरी येथे हे लॉक डाऊन पूर्वी दररोज सुमारे साठ-सत्तर हजार साईभक्त सरासरी श्रीसाई दर्शनासाठी येत असतात, सुट्ट्या व उत्सवाच्या दरम्यान हीच संख्या लाखोंच्या पुढे दररोज जाते ,देश-विदेशातून येथे साईभक्तांचा ओघ सारखा सुरू असतो, त्यामुळे येथे स्वच्छता व शहराची सुंदरता वाढविण्याकडे अधिक जोर दिला गेलाहोता, श्री साईबाबा संस्थान ,शिर्डी नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था यांनी शिर्डी स्वच्छ सुंदर असावी म्हणून आपापल्या परीने प्रयत्न केले, कारण येथे देश-विदेशातून साईभक्त येत असतात व येथिल स्वच्छतेचा मेसेज बाहेर जात असतो, म्हणून शिर्डीत अधिक लक्ष शहर स्वच्छता, सुंदर करण्याकडे दिले गेले होते व याचाच परिणाम म्हणून यापूर्वी देशात शिर्डीला स्वच्छ व सुंदर शिर्डीचे दुसरे क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते व आता केंद्र सरकारने घोषित केलेल्या याच बाबतीत फाइव स्टार रेटिंग मध्येही शिर्डीला थ्री स्टार रेटिंग स्वच्छता, सुंदरता याबाबत मिळाले आहे ,यामुळे देशात शिर्डीचे नाव आणखीन झळकले आहे ,या थ्री स्टार रेटिंग मिळाल्याबद्दल शिर्डी व परिसरातून व साईभक्तं मधून शिर्डीतील सर्व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते , सर्व नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
Post a Comment