ईद पर्यंत कापड दुकाने बंद ठेवा,मुस्लिम समाजाची मागणी.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) 25 मे रोजी रमजान ईद असून तोपर्यंत शहराची बाजारपेठ सुरू करताना कापड विक्री, चप्पल विक्री व महिला वस्त्रालयाची दुकाने 25 मे पर्यंत बंद ठेवण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांची भेट घेऊन केली. रमजान ईदचा सण चार दिवसांवर आला असून या निमित्ताने बाजारात गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सींगचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेली दोन महिने प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शहरातील परिस्थिती हाताळली आहे. बाजारपेठ सुरू केल्यामुळे अनेक लोक गर्दी करतील मात्र त्याचे खापर मुस्लिम समाजावर फोडण्यात येईल. दुर्दैवाने जर कोरूना पेशंट सापडले तर पूर्ण शहराला त्याचा त्रास होईल म्हणून शहरातील कापड विक्री व ईदशी संबंधित दुकाने 25 मे नंतर उघडण्यात यावी अशी मागणी
 या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधी आदींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि श्रीरामपूर
शहरातील बाजारपेठ गेली दोन महिने बंद आहे. गत आठवड्यात चार दिवस आपण ती सुरू केली. मात्र व्यापारी आणि नागरिकांचे असहकार्य आणि कोरोणाचा वाढलेला धोका पाहून ती पुन्हा बंद करण्यात आली . याबाबत मंगळवारी पुन्हा शासकीय कार्यालयात मीटिंग होऊन बाजारपेठ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे समजते . 25 मे रोजी मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद आहे. ईद निमित्ताने खरेदीसाठी मुस्लिम समाजाची मोठी झुंबड बाजारपेठेत उडण्याची शक्यता आहे. यातून सोशल डिस्टेंसिंगचे प्रश्न निर्माण होऊन गेली दोन महिने जीवाचे रान करून जी गोष्ट आपण सांभाळली. ती घडण्याची शक्यता आहे. कारण व्यापारी कुठल्याही पद्धतीने गर्दीचे नियोजन करीत नाही असा मागचा अनुभव आहे. बाजारपेठ सुरू केल्यामुळे शहराबरोबरच आसपासचे लोकही त्यामध्ये सहभागी होऊन खरेदी करणार आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. बाजारपेठ उघडणे आवश्यक आहे हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. परंतु त्यातून कोरोनाचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणून आमची *आपणास विनंती आहे की 25 मे पर्यंत शहरातील रेडीमेड, कापड व साडी, ड्रेस मटेरियल विक्रीची दुकाने, शूज अँड चप्पल्सची दुकाने,महिला वस्त्रालयाची दुकाने यांना उघडण्याची परवानगी देऊ नये.* इतर दुकानांना परवानगी देण्यास आमची हरकत नाही. प्रशासनाने गेली दोन महिने अत्यंत कष्टपूर्वक श्रीरामपूर शहराची परिस्थिती हाताळून शहर कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळवले आहे. आपल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे पूर्ण शहर संकटात सापडणार नाही याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. व्यापार्‍यांचे हित पाहत असताना जनतेचे हित पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तरी आमची आपणास विनंती आहे की वरील प्रमाणे दुकाने सोडून इतर दुकाने सुरू करण्यास आमची हरकत नाहीअसेही या निवेदनात म्हटले आहे .
                   याप्रसंगी बोलताना अहमद जहागीरदार यांनी चार दिवसांपूर्वी शहरातील दोन कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झाली असताना नियमानुसार ती दुकाने सील का करण्यात आली नाही असा प्रश्न विचारला . तर आदिल मखदुमी यांनी मोठ्या दुकानदाराची काळजी घेता मात्र शहरातील गोरगरीब चहाची टपरीवाले, पानपट्टी वाले, हात गाडीवाले हे हातावर पोट भरतात. त्यांना सुद्धा आपले व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली.
 जमियात उलेमा चे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शाद यांनी ईदच्या पार्श्‍वभूमीवर ईदशी संबंधित दुकाने 25 तारखेपर्यंत बंद ठेवावी . बाजारात सर्व जण येतील मात्र त्याचे खापर मुस्लिम समाजावर फोडले जाईल हे आम्हाला नकोय असे सांगितले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे यांनी तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत असून व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले.
 नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी समाजाच्या मागणीशी शंभर टक्के सहमती दर्शवून सामोपचाराने हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले .याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र पवार,राम टेकावडे,शशांक रासकर, आलतमश पटेल , निलेश ओझा, विकास जाधव ,पंडितराव बोंबले, साजिद मिर्झा, सलीमखान पठाण, आदिल मगदूमी, मुन्ना पठाण, मुक्तार शेख, इसाक आत्तार, फयाज बागवान, रियाज अन्सारी, फिरोज पठाण, सोहेल बारूदवाला, शन्नू बारुदवाला, नाजिम शेख आदी उपस्थित होते .
याबाबतचे निवेदन खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक ,उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे ,पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरटआदींना देण्यात आले .
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget