बुलडाणा - 19 मे - बुलडाणा जिल्ह्यातील माटरगांव जवळ वाळू तसकरांने एका पोलिस कांस्टेबलच्या अंगावरुन गाडी नेऊन त्याचा नाहक जीव घेतला. या घटनेला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी गांभिर्याने घेतले असून म्हणूनच बुलडाणा जिल्ह्यात वाळू तसकरांच्या मुसक्या आवळून्यास सुरुवात झालेली असून दररोज वाळू माफियांवर कारवाया सुरु असून जळगांव जामोद पोलिस ठाणे हद्दीत पूर्णा नदीच्या काठावर 10 ठीकाणी धाड टाकून ठाणेदार सुनील जाधव यांनी तब्बल 730 ब्रास अवैधरित्य स्टॉक करुण ठेवलेली वाळू पकडल्याने पूर्णा नदी काठच्या वाळू माफिया मध्ये खळबळ माजली आहे.
जळगांव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील काही भागात वाळू तसकरांनी अवैधपने नदितून वाळूचे उत्खनन करुण साठा करुण ठेवल्याची गुप्त बातमी ठाणेदार सुनील जाधव यांना मिळाली.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक हेमसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली 18 मे रोजी पूर्णा नदीच्या कडेला असलेल्या गोडेगाव शिवारात जाऊन पाहणी केली असता 10 ठीकाणी जवळपास 730 ब्रास रेती आढळून आली त्याची बाजार भावाप्रमाणे किंमत 21 लाख 90 हजार रुपये असून सदर रेती जप्त करण्यात आली आहे.त्याची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करुण पुढील कार्यवाही करिता तहसीलदार जळगाव जामोद यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या सह पीएसआई वाकडे पोलिस कर्मचारी राजू टेकाळे,गणेश पाटील,सचिन राजपुत,प्रविण जाधव यांचा समावेश होता.आता तहसिल प्रशासन या प्रकरणी काय कारवाही करते?या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Post a Comment