शिर्डी राजेंद्र गडकरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू असून सर्व बंद आहे ,तरीही काही व्यक्ती विनाकारण व परवानगी न घेता या गावातून दुसऱ्या गावात जात असतात ,अशाच संगमनेर येथुन ५ व्यक्तींना विनापरवाना,विनाकारण व मास्क न लावता। सावळीविहीरवाडीला आल्यानंतर व त्यांची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सावळीविहीर वाडी येथे ५व्यक्ती संगमनेर येथुनआल्यामुळे व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डी व सावळीविहिर परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,
। कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे , राज्यात साथ निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे, शासकीय कर्मचारी, डॉक्टर पोलीस सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहेत ,मात्र या काळात घरात राहणे उचित असताना काही व्यक्ती विनाकारण व विनापरवाना या गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात, त्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते, हा धोका असूनही दिनांक 27 रोजी संगमनेर येथील मदिनानगर येथून ५ व्यक्ती विनाकारण व विनापरवाना, गुपचुपपणे राहता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे आल्या होत्या , शिर्डी पोलीसांनि त्वरित सावळीविहीरवाडी गाठली व येथे येऊन अधिक तपास केल्यानंतर येथे मदिनानगर संगमनेर येथुन आलेल्या जब्बार अब्दुल पठाण वय 37 , सादीका जब्बार पठाण वय 31, निसार नूरमंहम्मद अन्सारी वय55, शबाना निसार अन्सारी वय 50, सुफिया निसार अन्सारी 24 अशा एकूण पाच व्यक्तीच्या तोंडाला मास्क न लावता, विनाकारण, विनापरवाना सावळीविहीरवाडी येथे आल्याचे स्पष्ट झाले ,त्यामुळे या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली असता ते कोणाला न सांगता संगमनेरहून सावळीविहीरवाडी येथे आले होते, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे,व लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे,, संचारबंदी जारी असतानाही विनाकारण फिरणे, या सर्व आरोपांमुळे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या ५ व्यक्तींवरभा,द,वि,कलम१८८(२),२६९,२७१व सात रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये तीन महिला आहेत, यामुळे मात्र शिर्डी सावळीवीहिर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा होत होत्या,
राहाता तालुक्यात असा प्रथमच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजते, सध्या कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू असताना, सर्व घरा-घरात असताना काही लोक जाणीवपूर्वक आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, असे कोणी नवीन लोक आपल्या गावात आल्याचे समजताच किंवा अनोळखी नवीन लोक येऊन राहत असेल तर त्यांची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला द्यावी ,असे आवाहनही शिर्डी पोलिसांनी केले आहे.
Post a Comment