शिर्डी -सध्या शिर्डी मध्ये लॉक डाऊन सुरू आहे, पोलीस व प्रशासन या काळात सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करतात, मात्र काही नागरिक तरीही रस्त्यावर विनाकारण फिरत असतात, अशा नागरिकांना आजही पोलिसांनी कान पकडून उठाबशा काढायला लावून शिक्षा दिली, तसेच दंडात्मक कारवाई केली ,शिर्डीत या कालावधीत सर्व घरात असताना व वारंवार सूचना करूनही अनेक जण सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने किंवा भाजीपाला ,किराणा, मेडिकल घेण्याच्या नावाखाली खोटे सांगून फिरत असतात, अशांची चर्चा करून व योग्य कागदपत्र तपासून खरे असल्यास सोडून दिले जाते, मात्र खोटे सांगून फिरणाऱ्यांना उठाबशा काढणे,दंडात्मक कारवाई करणे, मोटरसायकली जप्त करून घेणे ,अशा शिक्षा सध्या शिर्डी पोलीस विनाकारण फिरणारांना देत आहेत ,आजही सकाळी शिर्डीत पोलिसांचे पथक तैनात करून अशा विनाकारण फिरणार यांवर कडक कारवाई करण्यात आली, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले, त्यामुळे प्रत्येकाने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, सामाजिक दुरी व मास्क लावावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Post a Comment