शिर्डी राजेंद्र गडकरी - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, या लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात आहेत, गावात, शहरात सर्वत्र कर्फ्यू लागू आहे, सर्व बंद आहे ,त्यामुळे पशुपक्षी, प्राणी, वन्य प्राणी आता गावात, शहरात मन मोकळे बिनधास्त फिरताना ,संचार करताना दिसून येत आहे, माणसांना संचारबंदी आहे ,परंतु प्राणि मात्र मुक्त संचार करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे.सध्या देशात कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,रस्ते ओस पडले आहे, गावे ,शहरे शांत आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत त्यामुळे गावात, शहरात, गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी, आता नेहमी प्रेमाणे गजबजलेले ,गर्दीने फुलले वातावरण दिसून येत नाही ,अशा गर्दी नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी वानर, हरिण,मोर, अशा प्रकारचे वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पशु पक्षी गावात शहरात मनमोकळेपणे फिरताना दिसून येत आहे, उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ओस पडल्याने प्राणी बिनधास्त अशा ठिकाणी अधून मधून दिसून येत आहेत मग , बस स्टॅन्ड असो की, रेल्वे स्थानक असो मंदिरे असो की बाजारतळअसो, अशा ठिकाणी आता ह्या प्राण्यांनी मनुष्याची जागा घेतल्याचे दिसून येत आहे, शिर्डीच्या गजबजलेल्या साईनगर रेल्वे स्टेशन मध्ये सर्व सामसूम आहे अशा निर्मनुष्य साईनगर रेल्वे स्टेशनमध्ये मात्र उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुत्रेही रेल्वे स्टेशनमध्ये मनसोक्त आनंद घेत आहेत तर ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाऊन मुळे मंदिरे बंद आहेत, अशा मंदिरांच्या सभामंडपात गावातील भटके कुत्रे ,शेळ्या ,गाया दुपारच्या वेळी मस्त आराम करताना दिसून येत आहेत, मानवाची जागा या काळात हे प्राणी आता भरून काढता की काय असे वाटत आहे। अनेक वांनरे ,माकडे, जंगलातून गावात शहरात येत आहे,व दिसू लागले आहेत, उन्हाळ्यातील पाण्याच्या आशेने म्हणा किंवा शांत शांत वातावरण मनात पण असे प्राणी गावात आता दिसत आहेत, त्यात सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, या उकाड्यामुळे बिळातले सर्प आता हळूहळू बाहेर येऊ लागले असून त्यांचाही संचार सार्वजनिक ठिकाणी वाढल्याचे दिसून येत आहे, आजच आश्वी येथे मुंगसाच्या तावडीतून एका सापाला सर्पमित्राने वाचवले, तर कोळपेवाडी कारखान्यावर कोब्रा नागासारखी दिसणारी लांबलचक धामीण दुसऱ्या एका सर्पमित्राने पकडली , यावरून हे साप आता बीळा बाहेर व सार्वजनिक परिसरात वावरू लागले आहेत , हे दिसून येते ,सध्या कडक उन्हाळ्यामुळे पशु, पक्षी वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कासावीस करू लागली आहे , त्यामुळे असे हे प्राणी पाण्याच्या ओढीने गावाकडे येऊ लागले आहेत , कोल्हे, मोर तर परिसरातील काही ठिकाणी वाड्या-वस्त्यांवर लांडगे हे आता दिसू लागले आहेत ,त्यात लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने गजबजलेले गावे शहरे दिसत नाही, त्यामुळे असे वन्यप्राणी बिनधास्त संचार करताना दिसू लागले आहेत, गावातील, शहरातील मोकाट असणारे पाळीव प्राणी, कुत्रे ,डुकरे , बैल, गाढवे यांनाही सध्या उदर निर्वाहासाठी मोठी धावपळ करावी लागत दिसत आहे, राहाता तालुक्यातील शिंगवे रुई भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहे, हा कडक उन्हाळा जाणवायला लागल्यापासून ही हरणे आता संचारबंदीचा फायदा घेत गावाच्या जवळ संचार करताना दिसू लागले आहेत, या बंद काळात पाळीव जनावरे यांच्या चाराचाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
Post a Comment