आसाम राज्यातील शिष्टमंडळाची बेलापूरच्या घरकुल वसाहतीस भेट
बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु असलेल्या घरकुल बांधकामास आसाम राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली.कामाची पाहाणी केल्यानंतर सदर घरकुल वसाहतीबद्दल प्रशंसोदगार काढले.बेलापूरची घरकुल योजना हि पथदर्शक असून अशा पध्दतीचा पॕटर्न सर्वञ राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आसाम राज्याचे ग्रामविकास विभागाचे सहआयुक्त धृवज्योती नाथ यांनी केले. आसाम राज्याच्या शासकीय शिष्टमंडळाने बेलापूरच्या घरकुल वसाहतीस भेट दिली.सदरच्या शिष्टमंडळामध्ये श्री.धृबज्योती नाथ(सहआयुक्त, पंचायतराज व ग्रामविकास आयुक्तालय,आसाम)श्री. रणजीत दास(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना ,आसाम), श्री.निलोतनाथ मिश्रा(एस.पी.ई.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना,आसाम) यांचेसह अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री.किरण साळवे आदि सहभागी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच सौ. मीनाताई साळवी, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी घरकुल कामाबाबत सविस्तर माहिती दिली. सदर प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर बेलापूरची घरकुल योजना पथदर्शक असून हा पॕटर्न सर्वञ अवलंबला जावा असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, इंजिनिअर विकास पगारे,हर्षल दांगट,गणेश गोरे, शरद त्रिभुवन,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ,पुरुषोत्तम भराटे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,अँड.अरविंद साळवी,जाकीर हसन शेख,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,जाकीर शेख,शफिक शेख,सौरभ बनकर,दादासाहेब कुताळ,बबन गायकवाड,विशाल सुरडकर, सुनिल हिवराळे,संतोष मगर,आकाश वाद्ये, अमजद शेख,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळुंके,बाबासाहेब प्रधान आदी उपस्थित होते.*


Post a Comment