बाभळेश्वर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या मेळाव्यास संबोधित करताना श्री.पोखारकर बोलत होते.मेळाव्यास जिल्हाध्यक्ष श्री.संपत समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे,नगर शहर कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, शिर्डी अध्यक्ष श्री दशरथ पवार सर, संगमनेर अध्यक्ष श्री अशोक देशमुख यांनी संबोधित केले.चर्चेत श्री शिवाजी शितोळे, श्री राठोड श्री इनामदार श्री कडू यांनी सहभाग घेतला.
पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच अर्थसंकल्पात तरतूद न झाल्याने दि.९ ते ११ मार्च २०२६ ला दिल्लीमध्ये जंतरमंतर वर होणा-या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. लक्ष्मण हासे, श्री. अरसुळे, श्री. अर्जुन जाधव, श्री. सुरेश कटारिया, श्री. रायभान तुपे , श्री. चेडे, श्री. खंडीझोड श्री. केशव वर्पे यांची विशेष उपस्थिती होती.प्रास्ताविक श्री चिंतामणी यांनी केले तर आभार श्री गोविंद जगताप यांनी मानले.


Post a Comment