पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेले व्यापारी रामप्रसाद चांडक धार्मिक पर्यटनानंतर पोहचले नाशिकला त्यांचे साडूकडे!
श्रीरामपूरःगेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर येथून बेपत्ता झालेले आणि पोलिसांना शोधण्यात अपयश आलेले व्यापारी रामप्रसाद चांडक यांचा अखेरीस ठावठिकाणा लगला आहे.श्री.चांडक हे धार्मिक पर्यटन करुन नाशिक येथे त्यांचे साडू श्री.करवा यांचेकडे पोहचले आहेत. चांडक कुटुंबिय त्यांना आणणेसाठी नाशिकला रवाना झाले असून चांडक कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना अवगत केले आहे. याबाबतची हकीकत अशी की,रामप्रसाद चांडक हे बेलापूरला त्यांचे मुलासोबत मोटार सायकलवर आले.बेलापूरला ते मुख्य झेंडा चौकात उतरले.त्यानंतर ते बेपत्ता झाले.दोन दिवस शोध घेतल्यावरही तपास न लागल्याने चांडक कुटुंबियांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.त्यानंतरही शोध न लागल्याने व्यापारी तसेच ग्रामस्थांनी पोलिसांनी तपासाला गती देवून चांडक यांचा शोध घ्यावा अशा आशयाचे निवेदन दिले.त्यानंतरही आठवडाभरात पोलिसांना शोध लावण्यात अपयश आले. अखेरीस काल शुक्रवारी मध्यराञी श्री.चांडक हे विविध धार्मिकस्थळांना भेटी देवून अखेरीस नाशिकस्थित त्यांचे साडू सुनील करवा यांचेकडे पोहचले.ते पोहचल्याचे श्री.करवा यांनी किशोर चांडक यांना कळविले.सदरची माहिती मिळाल्यानंतर किशोर चांडक व त्यांचे औरंगाबाद येथील मेहुणे श्री.चांडक यांना आणण्यासाठी नाशिकला गेले.जाताना त्यांनी आम्ही नाशिकला जात असल्याबाबत पोलिसांना अवगत केले.
Post a Comment