मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत बेलापूर खुर्दमध्ये चर्चा सत्र; प्रशासन, पोलीस व ग्रामपंचायतीचा संयुक्त इशारा

बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावामध्ये स्री पुरुष जन्मदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेवून कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत ,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा

जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे कृत्य कुणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाह पासून वंचित आहेत यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक  व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते तालुक्याचे जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका. स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या मनातील नकारात्मक भावना काढून टाका आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे. कुणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या  की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे ग्रामपंचायत  व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.या वेळी द्वारकनाथ बडवे कैलास वाकडे गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे ,सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड ,मनीषा थोरात , प्रियंका थोरात कल्पना भगत ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने ,संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले शेवटी उपसरपंच एडवोकेट दिपक बारहाते यांनी आभार मानले

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget