[ एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरत आहे.येथील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत.पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे. - सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव ]
शेतकऱ्यांच्या शेतातील वीज मोटारीच्या केबल चोरणारे चोरटे बेलापुर पोलीसांनी पकडले .
बेलापुर (प्रतिनिधी )- :बेलापुर व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे- टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकऱ्यानी केबल जाळतांना रंगेहाथ पकडले मात्र चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला या बाबतची माहीती बेलापुर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीली पोलीसांनी गणेश संतोष आल्हाट यास ताब्यात घेतले पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आदित्य नामदेव आहेर रा वडजळी भोकर याचे नाव सांगितले पोलीसांनी तातडीने आरोपी आहेर याची माहीती घेवुन त्यास शिताफीने अटक केली.तसेच आणखी काही जण पोलीसांच्या रडारवर असुन एक इसम संशयीत म्हणून ताब्यात घेतला आसल्याची माहीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच चोरीची तांब्याची तार विकत घेणारा मुस्ताक याकुब शेख यास देखील ताब्यात घेतले असुन न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धुर निघत होता, एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतांत मोटार चालू करण्यासाठी जात असतांना सदर बाब शेतकऱ्याच्या निदर्शनास आली शेतकऱ्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता,सदर चोरटे लंपास केलेल्या केबली जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते. सदर शेतकऱ्यानी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली सदर शेतकऱ्यानी लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबद माहिती देताच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून आरोपी बाबत माहीती घेतली पोलीसांनी संशयावरुनआगोदर अल्हाट यास ताब्यात घेतले नंतर आहेर यास ताब्यात घेतले असुन पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे ,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे., सदर आरोपीकडून सखोल तपास केल्यास या ताब्याच्या तारा स्वस्तात विकत घेणारा मोठा मासा गळाला लागु शकतो काल सदर घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबल सह अन्य वस्तु बाबत तक्रार दिल्या आहेत.
Post a Comment