बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपूर प्रवरा नदी पात्रात.महसूल पथकाने गुरुवारी दुपारी अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३ चप्पू जेसीबीच्या तोडफोड करून पूर्णपणे नष्ट केले.प्रवरा नदीकाठवरील कडीत (ता.श्रीरामपूर ) हद्दीतून १ चप्पू गुहा (ता.राहूरी) गावाच्या हद्दीलगतच्या २ चप्पू दोरीने वाळू तस्कारांनी बांधून ठेवले होते.३ चप्पू तोडून टाकून महसूल पथकाने नष्ट करून कारवाई केली. अनेक दिवसांपासून कडीत येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळाली.तालुक्यातील प्रवरा नदीकाठी अवैधरित्या वाळुची खुलेआम वाहतूक सुरू होती.गुरूवारी दुपारपासून महसुल पथकाने प्रवरा नदीपात्रात कारवाई केली त्या वेळी प्रवरा नदी पात्रातुन वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारे ३ चप्पू पकडण्यात आले.
ते जेसीबीच्या सहाय्याने तोडून नष्ट करण्यात आले.श्रीरामपुरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार महसुल पथकाने कडीत येथील प्रवरा नदीपात्रात धडक कारवाई केली.विशेष म्हणजे भरलेले चप्पू नदीपात्राकडेला वाळू तस्कारांनी कटवनात लपून ठेवले होते.त्यामुळे प्रशासनासमोर ते काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र अट्टल पोहणाऱ्याच्या मदतीने ३ चप्पू नदीपात्राबाहेर काढत तोडून टाकण्यात आले.पथकाच्या सुगावाने अवैध वाळु उपसा करणारे मात्र पसार झाले.शासनाने सहाशे रुपयात वाळू देण्याचे धोरण सुरु केले असले तरी आजही कडीत पासुन ते भेर्डापूर पर्यत अनेक ठिकाणी वाळू उपसिसा केला जात आहे काही ठिकाणी वाळू उपसा करुन गाढवाच्या सहाय्याने बाहेर काढली जाते तेथेही कारवाई या पथकात मंडलाधिकारी बी.के मंडलिक,उक्कलगावचे तलाठी इम्रानखान इमानदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे शहाजी वडितके संतोष पारखे कडीतचे पोलीस पाटील कारभारी वडितके यांच्या आदी कर्मचारी सहभागी झाले.यावेळी रावसाहेब वडितके भाऊसाहेब वडितके कडीतचे सरपंच यांचे पती पाडुरंग वडितके उपस्थित होते.
Post a Comment