राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सीबीएसई संघाला विजेतेपद.मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणेच्या संजना गोठस्कर हिच्या नेतृत्वाखाली संघाची सुवर्ण कामगिरी

भुवनेश्वर (गौरव डेंगळे):भुवनेश्वर ओडिसा येथे संपन्न झालेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सीबीएसई संघाने प्रथम क्रमांक मिळविला.१४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१ ते २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत २८ राज्यांनी सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या

सीबीएसई संघामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे शाळेतील ९ खेळांडू खेळत होते.सीबीएसई महाराष्ट्र संघाने राजस्थान,दिल्ली,मध्यप्रदेश या राज्यांचा साखळी सामन्यांमध्ये पराभव केला.उपांत्य फेरीचा लढतीत बलाढ्य तमिळनाडू संघाचा रंगतदार झालेल्या सामन्यात ३-२ (२५-२०,२५-२१,१८-२५,२०-२५ व १५-११) ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश संघाचा ३:० (२५-२२,२५-२१ व २५-२२) ने पराभव करून विजेतेपद मिळवले.विजयी संघातून संजना गोठस्कर(कर्णधार),उपज्ञा कारले,आरमान भावे,देवकी रावत,ओवी कदमबांडे, सई जगताप, उमा साईगावकर,अन्वी गोसावी, सई घीवे,सखी दोरखंडे,ॠतुजा डोंगरे यांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले.विजयी संघास राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री. कुलदिप कोंडे यांनी मार्गदर्शन केले,संघ व्यवस्थापक म्हणून गिताजली भावे व तृप्ती कदमबांडे यांनी काम पाहिले. संघाचे मेंटोर म्हणून शिवाजी जाधव यांनी काम पाहिले.विजयी संघातील खेळाडूंचे शाळेचे संचालक अन्वीत पाठक,अंचिता भोसले,प्राचार्या राधिका वैध,सचिन गायवळ ,रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget