या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब अंबाडे पाटील यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.या वेळी सुरेश लव्हाटे
यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, खेळातून होत असलेल्या व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्य,जिल्हा, विभाग पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली.या वेळी स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी खेळाविषयी शपथ घेतली.या तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,खो-खो,१०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,लांब उडी,रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.या वेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे पाटील, सदस्या निकिता दिपक अंबाडे, रूपाली अजित अंबाडे,शाळेचे प्राचार्य हेमंत सोलंकी, सुनिलकुमार जैन
तसेच शिक्षक-शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment