LCB वर गंभीर आरोप! पत्रकार संघटनेचा थेट तक्रार अर्ज ,अवैध धंदे, भंगार व्यवहार आणि काही अधिकाऱ्यांचा अतिरेक!

अहमदनगर जिल्ह्यातील लोकल क्राईम ब्रँच (LCB) विभागावर गंभीर आरोप होत आहेत. इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम आवद बिनसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जातून या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.तक्रारीत नमूद केलं आहे की, अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि राहुरी परिसरातील काही ठिकाणी LCB पथकाकडून अवैध व्यवसाय, दारू विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांचा व्यवहार आणि काही भंगार विक्रेत्यांना संरक्षण दिलं जात असल्याच्या चर्चा जोरात आहेत.

पत्रकार संघटनेने या संदर्भात स्पष्ट म्हटलं आहे की

LCB चे काम गुन्हे उघड करणं आहे; पण काही ठिकाणी गुन्हेगारांचं रक्षण करणं दिसतंय. हा विभाग जनतेसाठी भयावह नव्हे, सुरक्षिततेचा आधार व्हायला हवा.”

यासोबतच तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरेक आणि दबावाच्या वागणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नमूद आहे.

पत्रकार संघटनेच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा ठळक करण्यात आला आहे —

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं धोरण राबवलं होतं, पण अलीकडे पुन्हा त्याच धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पत्रकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती राबविण्याची मागणी केली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget