बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले. येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.


Post a Comment