ऋषिकेश वाबळे यांची दक्षिण आफ्रिकेत साखर उद्योग व्यवस्थापन प्रकल्पासाठी निवड
बेलापूर (प्रतिनिधी)- येथील करून ऋषिकेश साहेबराव वाबळे याची दक्षिण आफ्रिकेतील डरबान शहराजवळ जवळील केप टाऊन येथे साखर कारखान्याच्या व्यवस्थापना संबंधित सॉफ्टवेअर तयार करण्याचे व अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करण्याकरता निवड झाली असून त्याच्या या निवडीमुळे श्रीरामपूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा असा वर्षोव होत आहे बेलापूर येथील ऋषिकेश वाबळे हे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव रामराव वाबळे यांचे चिरंजीव आहेत .त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेलापूर येथील जेठाभाई ठाकरशी सोमय्या हायस्कूल येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी एमआयटी कॉलेज पुणे येथून बी टेक एम बी ए ॲग्री अँड फूड मॅनेजमेंट पदव्या संपादन केल्या शिक्षणाच्या काळात त्यांनी साखर उद्योग आणि कृषी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी कठोर मेहनत घेऊन शिक्षण व कौशल्याच्या जोरावर थेट परदेशात आपली छाप उमठविली आहे .याप्रसंगी अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, आमदार हेमंत ओगले, अरुण पाटील नाईक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके ,बाळासाहेब भांड,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, संजय गोरे ,लहान भाऊ नागले ,अशोक राशिनकर, बाजार समितीचे सर्व संचालक सभासद व व्यापारी वर्गांनी ऋषिकेश वाबळे त्याचबरोबर सचिव साहेबराव वाबळे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. बेलापूरच्या मातीतून घडलेल्या ऋषिकेश वाबळे यांनी आज जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करुन दिली आहे .


Post a Comment