ताज्या घडामोडी – सिन्नर येथून व्यक्ती बेपत्ता
सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत.
प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे :
उंची : 5 फूट 6 इंच
रंग : सावळा
चेहरा : उभट
केस : काळे, छोटे
वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट
याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे.
सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे.
📞 संपर्क : 9860158354
तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड
स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण


Post a Comment