बेलापुर ग्रामपंचायतीने बसविलेल्या सी सी टीव्हीमुळे गुन्हेगारीला वचक- पो नि देशमुख
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर गावातुन बाहेर जाणाऱ्या तसेच गावात येणाऱ्या रस्त्यावर अकरा अति उच्च दर्जाचे सी सी टी व्ही कँमेरे बसविल्यामुळे आता परिसरात होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्वास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातुन अति उच्च दर्जाचे अर्धा किलोमीटर पर्यतचे चित्रण सुस्पष्टपणे करणारे अकरा कँमेरे मुख्य चौकात बसविले त्यात बेलापुर झेंडा चौकात चार उक्कलगाव कोल्हार चौकात तीन कँमेरे व बेलापुर श्रीरामपुर गोडी शेव रेवडी चौकात तीन बेलापुर काँलेज जवळ एक असे अकरा कँमेरे बसविले या कँमेऱ्याचे नियंत्रण हे बेलापुर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले .श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कँमेऱ्याबाबत,जि प सदस्य शरद नवले ,सरपंच स्वाती अमोलीक,उपसरपंच मुस्ताक शेख,टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्याकडून सर्व सी सी टी व्ही ची माहीती घेवुन समक्ष पहाणी केली .नविन बसविलेल्या कँमेऱ्यात रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता मग तो दुचाकीवर असो किंवा चार चाकीवर तसेच वाहनाची नंबरप्लेट देखील स्पष्ट दिसत होती हे चित्रण पाहुन पी आय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले तसेच गावातील सर्व पतसंस्था बँंका व्यापारी शाळा काँलेज या सर्वांनी आपल्या व गावाच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवावे असे अवाहनही देशमुख यांनी केले या वेळी पी एस आय दिपक मेढे उपसरपंच मुस्ताक शेख प्रफुल्ल डावरे ऐ एस आय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले,तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी आदि उपस्थित होते.
Post a Comment