या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेला त्यामुळे धुळ्याला जाणाऱ्या या मजुरांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला.
अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे ऊस तोडणी मजुरांना झाला मनस्ताप
बेलापुर (प्रतिनिधी )-कारखाना बंद झाल्यामुळे गावाकडे निघालेल्या ऊस तोड मजुराची बैलाने भरलेली गाडी उत्साही गोरक्षकांनी अडविली.परंतु चौकशी करुन पोलीसांनी ती गाडी सोडुन दिली परंतु या सर्व प्रकारामुळे ऊस तोड मजुरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बेलापुरात काल चुकीचा संदेश मिळाल्यामुळे अति उत्साही कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने बांधलेले कंपाऊड तोडले होते तो गोंधळ बराच वेळ चालला होता शेवटी पुन्हा तार कंपाऊड केल्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यातच बेलापुर चौकातुन बैलाने भरलेले वहान जात असल्याचे समजताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी ते वहान अडविले दौंड कारखाना बंद झाल्यामुळे ऊस तोडणी करणारे मजुर गाडीत बैलासह सामान भरुन धुळ्याकडे गावी निघाले होते बैलाने भरलेली गाडी पहाताच काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी ती अडवली जमावाला पाहुन चालकही घाबरला मग ती गाडी बेलापुर पोलीस स्टेशनला नेण्यात आली .पोलीसांनी सविस्तर चौकशी केल्यावर असे समजले की कारखानां बंद झाल्यामुळे ते ऊस तोडणी मजुर घराकडे निघाले होते या प्रकरणाची माहिती मिळताच टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथा व पत्रकार देविदास देसाई यांनी शहनिशा करून पोलिसांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली व सदर वाहन सोडण्याची विनंती केली टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा यांनी दौंड कारखाना व्यवस्थापनाशी देखील संपर्क साधला सर्व बाजुने चौकशी केल्यानंतर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे यांनी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वांची शंका निरसन झाल्यानंतर पोलिसांनी ते वाहन सोडले.मात्र
Post a Comment