व्यापारी बंधु भगीनींची अशोक कारखान्यास भेट
बेलापुर (प्रतिनिधी )-दररोजच्या आहारात असणारी साखर कशी तयार होते ऊस चरख्यात घातल्यापासून ते साखर तयार होईपर्यत काय काय प्रक्रिया होतात याची प्रत्यक्ष माहीती घेण्याचा योग बेलापुरातील महीलांना आला बेलापुर व्यापारी असोसिएशन बेलापुर किराणा मर्चंड असोसिएशन सुवर्णकार संघटना यांच्या वतीने गावातील ५० व्यापारी व महीलांना अशोक सहकारी साखर कारखान्याची पहाणी व माहीती घेण्याकरीता सहल आयोजित करण्यात आली होती ,ऊसापासून रस साखर ईथेनाँल स्पिरीट विज निर्मिती या सर्व बाबींची सविस्तर माहीती या वेळी देण्यात आली .त्यानंतर कारखाना बैठक हाँलमध्ये मुळा प्रवरा विज संस्थेचे चेअरमन सिध्दार्थ मुरकुटे अशोक कारखान्याच्या संचालीका सौ मंजुश्री मुरकुटे जेष्ठ संचालक हिम्मतराव धुमाळ माजी संचालक राधाभाऊ उंडे कारेगाव भाग कंपनीचे संचालक नारायण बडाख तसेच अशोक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने विक्रांत भागवत यांनी सर्व उपस्थित व्यापारी बंधु व भगीनींचे स्वागत केले .या वेळी युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे तसेच संचालक हिंमतराव धुमाळ यांनी माहीती देताना सांगितले की अशोक कारखान्यावर श्रीरामपुर तालुक्याच्या बाजारपेठेचे भवितव्य अवलंबुन आहे कारखान्याच्या चोख व्यवस्थापनामुळे परिसरातील कारखाने बंद पडले तेथे अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे उद्योग क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही अशोक कारखाना प्रगती पथावर आहे या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण शिवसेना नेते संजय छल्लारे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष अनिल मुंडलीक जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रविण लुक्कड यांनीही मनोगत व्यक्त करुन अशोक सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे या कारखान्यामुळेच श्रीरामपुर बेलापुरची बाजारपेठ गजबजलेली असते अशोक सहकारी साखर कारखान्याची अशीच प्रगती होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. या वेळी पंकज हिरण केदारनाथ मंत्री विकी मुथा महेश मंत्री आनंद लुक्कड प्रविण राका बेलापुर मर्चंडच्या संचालिका सरोज लुक्कड सुषमा लढ्ढा मोनाली लुक्कड सोनाली लुक्कड रश्मी लुक्कड सुषमा लुक्कड सुनंदा चांडक अक्षरा मुंदडा गौरी मंत्री दिव्या मंत्री राखी हिरण सुलोचनाबाई लखोटीया चंद्रकला हिरण स्वाती राका निकीता लुक्कड रेणुका मुंडलीक कविता सुनिल मुथा गीता मुथा शिल्पा लखोटीया सुवर्णा चोरडीया मिना दिलीप दायमा पुर्वा मुथा रोहीत वाकचौरे जयेश लढ्ढा यश बिहाणी आदि उपस्थित होते .या सहलीचे आयोजन करण्यासाठी गणेश लढ्ढा शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा अनिल मुंडलीक कारखान्याचे जेष्ठ संचालक हिंमतराव धुमाळ आदि प्रयत्नशिल होते
Post a Comment