बेलापूर( प्रतिनिधी) कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा असफल प्रयत्न झाला चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.पण तो असफल झाला. बेलापूर कोल्हार चौकात असलेले एटीएम यापूर्वी देखील फोडण्याचा प्रयत्न झाला होता . त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने खबर दिली पोलीसही सायरन वाजवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले
सायरन चा आवाज ऐकताच पोलीस आल्याची चाहुल लागली आणखी चोरटे चार चाकी वाहनातून फराक्ष झाले. काल पुन्हा चोरट्यांनी त्याच एटीएमला लक्ष केले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएम फुटले नाही. त्यांनी एटीएम च्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागदी पट्ट्या लावल्या आणि नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने त्यातील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.
Post a Comment