अ‍ॅक्सिस बँकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, ग्राहकाच्या खात्यातून परस्पर पैश्याची चोरी,

बुलडाणा - 29 सप्टेंबर
एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांची ऑनलाइन चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. खातेधारकांना खात्याचे तपशील न विचारता किंवा ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारा ओटीपीही न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गहाळ होत असल्याच्या अनेक घटना मागील काही आठवड्यांत घडल्या आहेत. यामध्ये बुलढाण्यात ही असाच प्रकार घडला असून या प्रकरणात ग्राहकाने बैंके विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
        बुलडाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचे अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत खाता आहे.त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला असून मोबाईल मध्ये गुगल पे या एप्सच्या माध्यमातून ते इतरांना पैशे ट्रांसफर करतात. दरम्यान 13 सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्रांच्या म्हणण्यावरून त्याच्या औरंगाबाद येथील कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता 7 हजार रुपये पाठविले असता हे 7 हजार त्याच्या मित्राच्या अकाउंट मध्ये न जाता इतरत कुठे गेले व यांच्या अकाउंड मधून 7 हजारची कण्यात झाली. तक्रारकर्ते शेख हे  याची माहिती विचारायला अक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशी संपर्क करा असे सांगण्यात आले. जेव्हा दोन ते तीन वेळा गुगल पे यांच्या कस्टमर केअरला सांगितल्या नंतर अकाउंड मध्ये कपात झालेले 7 हजारा ची रक्कम 21 सप्टेंबर रोजी परत आली. मात्र 22 सप्टेंबर ला रात्रि 1 वाजून 13 मिनिटाला गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंड मधून कापल्या गेले.याची माहिती एसएमएस च्या माध्यमातून कळल्यानंतर यासंदर्भात वसीम शेख यांनी 25 सप्टेंबर रोजी अक्सिस बँकेत जाऊन याबाबत शाखेतील ऑपरेशन हेड किशोर धुर्वे यांना विचारपूस केली असता त्यांना तुमचा अकाउंड हैक झाल्याची माहिती देत ऑनलाइन पद्धतीने पैसे कापल्या गेले असून एटीएमचा पिन नंबर बदलण्याचा सल्ला देत उडवा-उडवी ची उत्तरे दिली.यामुळे वसीम शेख यांनी बुलडाणा शहर पोलिसात अक्सिस बँकेने अकाउंट मधून विना परवानगी परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली यावरून पोलिसात 27 सप्टेंबर ला बुलडाणा येथील अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एव्हढेच नव्हे तर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला पुन्हा मध्यरात्री गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता पुन्हा परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंट मधून कापल्या गेले.यासंदर्भात अक्सिस बँकेने ऑनलाइन पद्धतीने ओटीपी नंबर न देता अकाउंड मधून परस्पर कसे पैसे ट्रान्सफर केले याचा तपास पोलीस करीत आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget