अहमदनगर (प्रतिनिधी) सावेडीतील बालिकाश्रम रस्त्यावर भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी पस्तीस हजारांचा ऐवज लंपास केला. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली.मंगल सखाराम पंडित या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांच्याच घरात चोरी झाली. पंडित या बालिकाश्रम रस्त्यावरील आर्यन गार्डनच्या डी विंगमध्ये राहतात. दुपारी एक वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केला.
Post a Comment