डेंग्यु ताप सावधानता बाळगा डॉक्टर सलीम शेख


डेंग्यु ताप सावधानता बाळगा डॉक्टर सलीम शेख
भारतात जवळ जवळ साथीचे आजार उद्भवतात आशिया आफ्रिका खंडात साथीचे आजार वारंवार डोके काढत असतात व गावच्या गाव साथीच्या कचाट्यात सापडतात व त्यामध्ये  फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा होते त्यामध्ये डेंगू ताप हासुद्धा एक घातक रूप घेत आहे सध्या तो महाराष्ट्रात आंध्र ,कर्नाटक ,आसाम या राज्यात धुमाकूळ घालत आहे आता सध्या पुणे व औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालतोय व कधीकधी आपल्या अहमदनगर श्रीरामपूर जिल्ह्यात त्याचे रुग्ण आढळतात सध्या पावसाचे दिवस आहेत त्याचप्रमाणे कधी किती वाढेल हे बिलकुल सांगता येत नाही त्याचा प्रसार कमी व्हावा हाच हेतू जनजागृती व्हावी ही आजची गरज प्रथम 1950 मध्ये दक्षिण आशिया व आफ्रिका येथे हा व्हायरस सापडला व नंतर तो क्युबा व अमेरिका या देशात पसरला हा व्हायरस चिकुन गुनिया  ज्या अँडीस नावाच्या जातीच्या डासांपासून होतो त्या तासांपासून डेंगू होतो हे डास चांगल्या वातावरणात चांगल्या स्वच्छ पाण्यात स्वच्छ डबक्यात स्वच्छ व निर्मळ वातावरणात आपले वास्तव करतात याचे पैदास प्रजनन व संगोपन हे चांगल्या पाण्यात व वातावरणात करतो व आठवड्यात याची पूर्ण वाढ व सक्षम म्हणून श्वास घेण्यास सुरुवात करतो अर्थात तयार राहतो याचे एक विचित्र पद्धत आहे तो फक्त दिवसातच चावा घेतो म्हणजे हा पूर्ण कार्यालयीन काम करतो
लक्षणे:- यामध्ये एकदम ताप येतो मळमळल्यासारखे होते कधीकधी उलट्या होणे डोके फार दुखणे डोळ्यात लाली येउन डोळ्यांमध्ये फार दुखणे डोळ्यांची उघडझाप करताना वेदना होणे सर्दी होणे भरपूर थंडी वाजून येणे अंग हात पाय खुप खुप दुखणे जबरदस्त कंबर दुखणे शरीरातील गाठी वाढतात व त्यावर सर्व शरीरावर लालसर चट्टे व पुरळ येणे ही लक्षणे सर्वात महत्वाचे डेंगू मध्ये असतात तसेच महत्त्वाचे लक्षण म्हणजे तोंडामध्ये लालसर चट्टे येतात नंतर पायावर चट्टे येउन संपूर्ण अंगावर  माशी पसरतात संपूर्ण शरीर लालसर गथील चावल्यासारखे होते ही सर्व प्रक्रिया शरीरांतर्गत चालू असते ती 3 ते 5 दिवसांपर्यंत चालू असते त्या नंतर पहिल्या लक्षणासारखीच लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवतात परंतु त्याची तीव्रताही कमी प्रमाणात असते
डेंगू चा प्रकार:- म्हणजे (डेंगू हीमोरेजीक फियर) अर्थात डेंगू रक्त भावी ताप हा प्रकार असेल तर धोकादायक असतो यामध्ये धोका होण्याची अत्यंत शक्यता असते या प्रमुख्याने शरीरातून एकदमच रक्तस्राव चालू होतो नाकातून तोंडातून शौचावाटे रक्‍त वाहू लागते झिरपू लागते रुग्ण एकदमच गळुन जातो बेशुद्ध अवस्थेत जातो ही अवस्था अत्यंत घातक असते धोकादायक असते ही अवस्था तिसऱ्या किंवा पाचव्या दिवसापासून होते कारण रुग्णांचे निदान लवकर न झाल्याने त्यामध्ये पांढरे पेशी कमी होणे व प्लेटलेट्स फार प्रमाणात कमी होऊन  थ्रम्बोसावटोपेनीया ल्युकोसाबटोसीस व रक्त गोठण्याची प्रक्रिया कमीकमी होते हे सर्व प्रक्रिया फेल हो जाते व रुग्ण दगावण्याची शक्यता येते.
खबरदारीचा उपाय:- डेंगू चे पहिल्याप्रथम सामाजिक कार्य म्हणून जनजागृती करावी नागरिकांनी एक सामाजिक कर्तव्य समजून आपल्या घराच्या परिसरातील परिसर स्वच्छ करावा त्यामध्य डबके ते बुजवावे व ते स्वच्छ करून निर्जंतुक करावे पाणीसाठल्यास ते स्वच्छ करून फेकून देऊन त्यामध्ये डासांचा साम्राज्य होणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या घरातील हौद स्वच्छ करावा गटारी पहिल्याप्रथम स्वच्छता ठेवावे त्या गटारी मध्ये त्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करावी गार्डन बगीचे झाडे असल्यास त्यावर कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी रात्री झोपताना स्वच्छ मच्छरदाणीचा वापर करावा किंवा मच्छर च्या वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात मच्छर प्रतिबंधक भेटतील ते वापरावे जेणेकरून पहिल्याप्रथम आपल्या स्वतःची काळजी घेता येईल आपल्या अगर आपल्या शेजारी किंवा कामगारांना याची लागण दिसल्यास शक्यता लवकरात लवकर आपल्या नजीकच्या किंवा फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा व त्वरित उपचार करावे आपल्या सरकारी आरोग्य केंद्रास किंवा नगर परिषद कार्यालयात याची नोंद घ्यावी जेणेकरून ते कीटकनाशकांची फवारणी करण्यास प्राधान्य देतील अशाप्रकारे प्रशासनास सहकार्य करावे व पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न करावा
डॉक्टर सलीम शेख बैतूश्शिफा हॉस्पिटल श्रीरामपूर.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget