सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी शिवसेनेच्या युवासेना मध्ये सहभागी होवून ऐतिहासिक चळवळीचे साक्षीदार बनावे असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनीं केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील शिवना सर्कल मध्ये युवासेनेच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अब्दुल समीर यांनी विविध गावांत बैठका घेवून युवकांशी संवाद साधला.
अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील युवासेनेने निर्धार केला असल्याचे अब्दुल समीर यांनी युवकांशी संवाद साधताना स्पष्ठ केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अब्दुल समीर यांनी सोयगाव तालुक्यातून पदयात्रेला सुरुवात केली आहे. सोयगाव मध्ये जवळपास 100 किलो मीटर पदयात्रा पूर्ण करून समीर यांनी सिल्लोड तालुक्यात पदयात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या पदयात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
शिवना सर्कल मध्ये आयोजित पदयात्रेस
शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, पंचायत समिती सदस्य सलीम शेख,मुरलीधरराव काळे,उपतालुका प्रमुख सुभाष करवंदे,सर्कल प्रमुख सुधाकर काळे, राजुमिया देशमुख, राजरत्न निकम, शेख सलिम, सुधाकर बनकर, पंजाबराव चव्हाण, भास्कर बनकर, रुद्राजी इंगळे, लक्ष्मण गव्हाणे, नाना गव्हाणे, अकिल देशमुख, रमेश चव्हाण, राजेश्वर आरके, जगन ठाले, गोविंदा गव्हाणे, तानाजी गव्हाणे, गणेश गव्हाणे, पंढरीनाथ चव्हाण, उपविभाग प्रमुख उत्तम भागवत, श्रावण गिरी, शिवा टोम्पे,गणेश राणा काळे,दादा पाटील काळे,संदीप राऊत,इस्माईल कुरेशी,शामराव लोखंडे,गणेश सपकाल,रावसाहेब काळे,विनायक काटकर,सुनील सपकाल,किरण दहितकर,सखाराम धनवई, दीपक वाघ, अमोल बोराडे,
Post a Comment