बुलडाणा - 28 सप्टेंबर
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील बोर्डि नदी मध्ये 15 वर्षीय मुलगा सेल्फी काढत असतांना तोल जाऊन पडला व पाण्यात वाहून गेल्याची घटना आज 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
मागील 4-5 दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.आज खामगाँव तालुक्यातील सुटाळा खुर्द या गावा जवळ वाहणारी बोर्डि नदीवर बाँधलेल्या बँधाऱ्यावर आज सकाळी 4-5 विद्यार्थी पोचले व सेल्फी काढत असतांना हेमंत राजेश जागींड वय 15 वर्ष याचा तोल सुटुन तो खाली नदित पडला,दुथडी भरूण वाहणारी नदीच्या पाण्यात हेमंत वाहून गेला,अशी माहिती त्याचे मित्रांनी दिल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले तसेच पोलिसही दाखल झाली असून हेमंतचा शोध सुरू आहे.
Post a Comment