26 लाखांचा गुटखा जप्त ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई .

नाशिक । प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरातहून जिल्ह्यात येणारा 26 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच, दिव व दमण येथील मदयसाठा हस्तगत केला आहे. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन म्हणून याचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता जारी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.27) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूका शांततेत व सुरळित पार पडाव्या यासाठी पोलिसांकडून सुरु असलेल्या ऑपरेशनची त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात 50 कुख्यांत गुंडाची दोन वर्षासाठी तडीपारी करण्यात आली आहे.अनेक गुंडांवर ‘एमपीडीए’ कायदयानूसार कारवाई केली जात आहे. फरार आरोपींना पकडण्याची मोहीम सुरु आहे. निवडणुकीत मदय, पैसा व इतर प्रलोभनाचा वापर होऊ नये यासाठी चेक पोस्टवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारावर सायबर सेलची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले. शहर हद्दीत 116 तडीपार शहर हद्दीत 116 जणांवर तडीपारीची तर 10 गुंडांवर ‘एमपीडीए’ची कारवाई केल्याची माहिती लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. 128 गुंडांविरुध्द अजामीनपात्र नोटीसा काढण्यात आल्या आहे. शहरातील 11 ठिकाणी अवैध मदय विक्रीवर छापे टाकण्यात आले. देशी कट्टे, काडतूसे व एक तलवार जप्त करण्यात आली आहे. संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget