सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२७) - सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यावरील एस एस डी शूज ही दुकाने जळून खाक झाली आहे. या जळीत दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झालेले आहे. आगीचे कारण नेमके काय आहे, समजलेले नसले तरीही विजेच्या शॉक सर्किटमुळे या दुकानांना आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या शहर पोलीस स्टेशन व नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एस एस डी शूज या दुकानांला मध्यरात्रीच्या अडीच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली असल्याचे समजल्यावर त्याच रस्त्यावर असलेल्या एका दुकानदाराने तातडीने धावत जाऊन पोलिसांना माहिती दिली पोलीस यंत्रणा लगेच घटनास्थळी पोहचल्यावर निवडणूक काळात आयटीआय शाळेच्या मैदानात उभे असलेली अग्निशमन गाडी काही मिनिटांत घटनास्थळी पोहचली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलीस प्रशासनाच्या मदतीला मोठ्या प्रमाणात नागरिक धावून आले. नगर परिषदेच्या अग्निशमन बंब्याच्या मदतीने व आसपासच्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आग विझविण्यासाठी खूप जिकरीचे प्रयत्न केले, परंतु आगीचा फडका इतका मोठा व भयानक होता की, एस एस डी शूज ही दुकान जळून खाक होईपर्यंत आगीचा बोंब शमला नाही. या घटनेत ईतर दुकानांना आगीचा फटका बसू नये म्हणून, संभाव्य धोका लक्षात घेत तातडीने आसपासच्या दुकानातील सामान बाहेर काढून दुकाने खाली करून घेतल्याने पुढील अनर्थ मोठा धोका टळला आहे.

Post a Comment