मोताळा तालुका कृषी अधिकाऱ्यावर महिला कर्मचारीचा कार्यालयातच विनयभंगाचा आरोप,पोलिसात गुन्हा दाखल .

बुलडाणा - 24 सप्टेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका कृषि कार्यालयात कार्यरत महिला कृषी सहाय्यक याचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच सोमवारी घडली असून याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध आज 24 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिला कृषी सहाय्यक यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की 23 सप्टेंबर रोजी मोताळा येथे तालुका कृषी अधिकारी के.एल. कंकाळ यांनी फिर्यादीला सोमवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास आपल्या कॅबिनमध्ये बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला व घरी कोणी नसताना मला बोलव असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली, तसेच लज्जास्पद बोलत अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकारामुळे पिडीत महिला कर्मचारी गोंधळुन आरोपीचा हात झटकला. तसेच सदर प्रकार नवऱ्याला सांगते असे म्हटल्यावर आरोपीने प्रशासकीय कारवाईची धमकी दिली. तसेच तू बुलडाणा येथून ये-जा करते, तुला उडवून देईल, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी के.एल.कंकाळ याच्याविरुद्ध भादविची कलम 354 (अ), 506 अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गरुड यांच्या मार्गदर्शनात एएसआय गजानन वाघ करीत आहेत.ही घटना समोर आल्या नंतर जिल्ह्यातील कृषि विभागात एकच खळबळ उडालेली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget