बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर पोलीसांनी बिड येथे चाललेला गव्हाचा भरलेला ट्रक पकडला असुन या बाबत चौकशी चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले श्रीरामपूर तालुक्यातुन या ट्रकमध्ये गहु भरलेला होता तो ट्रक बेलापूर येथे वजन करण्यासाठी जात असताना पोलीसांना संशय आला या बाबत चालकाकडे विचारणा केली असता त्यास व्यवस्थित माहीती देता आली नाही त्यामुळे पोलीसांनी चौकशी करीता तो ट्रक पोलीस स्टेशनला आणला या बाबत पोलीसांनी चौकशी केली असता हा गहु बि बियाणे महामंडळाकडून उचलला असल्याचे सांगण्यात आले असुन कमी प्रतिचा हा गहु असल्याचे ट्रक चालकाचे म्हणणे आहे हा गहु बिड येथे चालला होता या बाबत बेलापूर पोलीसाकडून चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले
Post a Comment