पुजा पंडित यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श समाजसेवीका युवा गौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद प्रतीनीधी:- युवा शक्ती पत्रकार संघ आणि साप्ताहीक युवा तर्फे समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.हा कार्यक्रम मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर ,औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना युवा गौरव पुरस्कार २०१९ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराने सर्वत्र समाज माध्यमांमध्ये पुजा यांचे कौतुक होत आहे.गोरगरिबांना नेहमी मदत करने गरजु पेशंटला रक्त मेडिकल जेवनाचे डबे पुरवणे आदि काम शासकीय रुग्णालयात माणुसकी समुहातर्फे केले जाते या आधीही पुजाला भुमीकन्या पुरस्कार लोकपत्र 2017 तर्फे राष्ट्रहित जनाधार वीश्वस्त मंडळ तर्फे 2018 पुरस्कार मिळाला आहे.पत्रकारिता क्षेत्रात लेखनीचा बादशाह म्हणुन ओळख असलेल्या अनील कुमार जमधडे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.व फोटोग्राफर आनीस रामपुरे यांना युवा गौरव पुरस्कार व आदर्श शीक्षक विशाल टिप्रमवार यांनाही आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनवर खान हे होते. तर प्रमुख पाहुणे जेष्ट नेते ईब्राहिम पठाण, दैनिक हिंदुस्तानचे संपादक नायाब अन्सारी, पत्रकार डॉ अब्दुल कदीर, एशिया एक्सप्रेसचे शारेख नक्शबंदी, मोहसिन अहेमद, सकाळचे शेखलाल शेख, गब्बर कमिटीचे मकसुद अन्सारी,  हनिफ बब्बू नगरसेवक छावणी, मोहम्मद जिया, उपसरपंच सय्यद शेरू, शेख खालेद, आदीची उपस्थित
साप्ताहीक युवाचे संपादक अब्दूल कय्युम,समाजसेवक सुमित पंडित,राजेंद्र ढवळे,संपादक हसन शाहा,मकसुद अन्सारी, मुख्तार खान बब्बू भाई, लतीफ खान, अशफाक शेख, रियाज बागवान, शेख यासिन, प्रविण बुरांडे, गणेश पवार, अॕड विलास खरात,आदी उपस्थित होते.पुजा पंडित यांचे माणुसकी समुहातर्फे कौतुक करन्यात आले.
व कार्यक्रमाचे सुत्र संचालक शेख मुक्तार यांनी केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget