भेर्डापूर परिसरात हॉटेल अजिंक्यतारा येथे हॉटेलमध्ये कूकचा खून.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा येथे हॉटेलच्या कूकचा खून करण्यात आल्याची घटना भेर्डापूर परिसरात रविवारी दुपारी घडली. तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावर हॉटेल अजिंक्यतारा आहे. त्याठिकाणी काल दुपारी हॉटेलचा कूक मोहम्मद शेख (वय 71) यांना डोक्यामध्ये जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते जागीच ठार झाले.सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान हे पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे, रवींद्र पवार, सतीश गोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. वायकर, काका मोरे, संदीप पवार, रवींद्र शेळके यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेची पाहणी करून पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही हॉटेलचे वेटर व कुक यांच्यात झालेल्या अंतर्गत वादातून घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget