October 2020

🔸शहर पोलिसाचे डीबी स्कॉडने तिन्ही आरोपिंना घेतले ताब्यात

बुलडाणा - 29 ओक्टोबर

बुलढाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैशे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरला व त्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले.अधिकारीच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपीना बुलडाणा शहर पोलिसच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसच्या स्वाधीन केले आहे.

    याबाबत पोलिसाने दिलेली माहिती अशी की बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल 18 वर्ष,आबिद खान अयुब खान उर्फ ऑल 18 वर्ष व अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या 19 वर्ष हे तिघे शॉपिंग साठी मुंबईला गेले होते. या पैकी एका जवळचा पाकीट हरवला.पैशे नसल्याने त्यांनी 22 ओक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रैक जवळ,बेलापुर नवी मुंबई येथे रासत्याने पायी जात असलेले 39 वर्षीय विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकुने वार करुण त्यांना जख्मी केले व त्यांचा जवळचा एंड्रॉइड मोबाइल व पाकिट मधील नगदी 8 हजार रुपये घेऊन फरार झाले.या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चीरला व ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरुद्ध सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात भादवीची धारा 394 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.जख्मी बिनवडे यांच्या मोबाइलचा लोकेशन घेतला असता तो मुंबई येथे दिसला,त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप सालुंखे यांना देण्यात आली.शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे,दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले.आज 29 ओक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाली असून तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या रॉबरीत मुम्बई येथील इतर 2 आरोपिंचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी असून आरोपी अमित बेंडवाल वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे ही ते म्हणाले.आरोपींना घेण्यासाठी नवी मुंबई येथील पीएसआई एन. डी.शिंदे,पीएसआई एन. पी.सांगळे,संदीप फड,विनोद देशमुख व अज़हर शेख बुलडाणा आलेले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- बेलापुर गावातील मुख्य पेठेतील रस्त्याची  तातडीने दुरुस्ती करुन डाबरीकरण करण्यात यावे या मागणी करीता सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने बेलापुर बु!! ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्ते आजपासुन उपोषणास बसले आहे                     बेलापुर बाजारापेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असुन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे यारस्त्याची ताताडीने दुरुस्ती न झाल्यास सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने उपोषणास बसण्याचा इशारा मंचचे गोपाल जोशी राजेश सुर्यवंशी शशीकांत तेलोरे रोहीत बोरा विकी मुथ्था गोपी दाणी आदित्य जाधव यांनी दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज साकाळपासुन हे कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसले आहे.

बुलडाणा - 28 ओक्टोबर

संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे हतबल झालेला आहे.कोरोना पासून वाचन्यासाठी फिजिकल डिस्टन्स,मास्क व वारंवार हाथ धुत राहणे हे उपाय सूचवलेले आहे.या नियमांचा पालन करून आपण कोरोनापासुन सुरक्षित राहु शकतात.बुलडाणा जिल्हा प्रशासन सुद्धा नागरिका मध्ये कोरोना संसर्गा बाबत जनजागृति करीत आहे.जिल्ह्यातील काही ठराविक कोविड सेंटर मध्येच कोरोना तपासणी केली जात होती त्यामुळे रुगणांना व त्यांचे नातेवाइकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सुरु 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोरोना तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.कोरोनाची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागातील जनतेने आपल्या गावा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून  घ्यावे,अशे आवाहन सुद्धा डॉ. सांगळे यांनी केले आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

बँगलोरच्या रिडास इंडीया कंपनीने बुलडाणा येथील एका गुंतवणूकदाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा व नफा न दिल्याच्या तक्रारीवरून आज 27 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कंपनीमालक व इतर एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील इकबाल नगर, टिपू सुलतान चौकात राहाणाऱ्या फिर्यादी मो. साजीद अब्दुल हसन देशमूख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई,वडील, भाऊ,पत्नी यांचे एनएफटी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बँगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अय्यूब हुसेन व मो. अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणूकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने आज 27 ऑक्टोंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी त्यांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध भांदवी कलम 420,406,409,34 सह महाराष्ट्र ठेवी वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.


बुलडाणा - 27 ओक्टोबर

धामणगांव बढे येथील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत स्व:ता जवळील नकली नोटा चलनात आणण्यासाठी भारतीय चलनातील खऱ्या नोटा मध्ये नकली नोटा मिसळवुन चलनात आणण्याचा प्रकार धा.बढे येथे समोर आला आहे. ही घटना 26 आक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे धामणगाव बढे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेतील 4 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. 

      बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या धामणगांव बढे परिसरातील कुरहा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले हा 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान पैसे भरण्या करीता स्टेट बँकेत आला. त्याने आपल्या सोबत नगदी 2 लाख  65 हजार रुपयाच्या नोटा आणल्या. नेहमी प्रमाणे बँकेतील कर्मचारीने नोटांचे विवरण लक्षात घेत नोटांची मोजणी करुन बँकेतील काउंटींग मशिनद्वारे तपासणी केली. यामधील 200 रु.च्या एकुण 365 नोटामध्ये तब्बल 181 नोटा नकली निघाल्या. ज्याची दर्शनी किंमत 36,200 रु. असलेल्या या चलनात आणण्या करिता खऱ्या चलनीय नोटा मध्ये समाविष्ट केलेल्या आढळुन आल्या.हा संपूर्ण प्रकार धा.बढे येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक राजेश संजीव सोनवणे यांचे सतर्कतेने उघड झाला. या घटनेची फिर्याद शाखा व्यवस्थापक सोनवणे यांनी धा.बढे पो.स्टे.दिली असता आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरु मगरेसे, राहुल गोटीराम साबळे, गोटीराम साबळे यांच्या विरुध्द कलम 489(इ), 489 (उ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी चारही अटक करुण त्यांना आज 27 ओक्टोबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता 2 नोहेंबर पर्यंत त्यांना पोलीस रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे. प्रकरणी जि.पो.अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पो. अधीक्षक बजरंग बंसोडे, उपविभागीय पो.अधीकारी रमेश बरकते तसेच बुलडाणा एल.सी.बी.चे पो.निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली धा.बढेचे प्रभारी ठाणेदार योगेश जाधव करीत आहे.या प्रकरणी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता असून बुलडाणा एलसीबीचा एक पथक शोधकार्या साठी रवाना झाल्याची माहिती एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.


बुलडाणा - 26 ओक्टोबरवा

ईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. यंदा कोरोना महामारीमुळे नियमांच्या चौकटीत दसरा सण साजरा करण्यात आला असून,बुलडाणा जिल्हा पोलिस मुख्यालयात पारंपारीक पद्धतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या हस्ते शस्र पूजन करण्यात आले. यावेळी होम डीवायएसपी बळीराम गिते,राखीव पोलिस निरीक्षक शिंदे व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे

बुलडाणा - 26 ओक्टोबरको:- रोनाच्या दहशतीतही मोठी जोखीम पत्कारून सेवा बजावणाऱ्या नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कामगार यांचे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुलडाणा जिल्हा रुग्णालयातच आज 26 ऑक्टोंबर रोजी जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले असता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

    जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व जगात गेल्या 7 महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कोरोना काळात डॉक्टर, नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कर्मचारी जीव मुठीत घेऊन कोविड योद्धे म्हणून कोरोना संशयीत व इतरही आजारग्रस्तां साठी सेवा देत आहे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांचे वेतन थकल्यामूळे त्यांना सण उत्सवाच्या काळात प्रपंच सांभाळणे कठीण झाले आहे. या कोरोना योद्धयांसमोर निर्माण झालेला आर्थिक पेचप्रसंग तात्काळ सोडविण्याची आग्रही भूमिका घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी कार्यकर्त्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक देऊन तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आंदोलकांना भेट देऊन चर्चा केली. काही तासातच प्रलंबित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे तडस यांनी आश्वासित केल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मदन राजे यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हा उपप्रमुख बंटी नाईक,शहर प्रमुख मनोज पवार, अनिल मोरे, विशाल गायकवाड, पवन सुरडकर, मनीष सोनवाल, अमर लोखंडे, अनिल वाघमारे,गौरव इंगळे आदी  उपस्थित होते.


संक्रापुर (प्रतिनिधी  )-राहुरी तालुक्यातील शेतकर्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असुन द्राक्ष डाळींब पेरु आंबा या फळबागांचेही नुकसान झालेले असुन  फळबागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील फळबाग शेतकऱ्यांनी केली आहे. नामदार प्राजक्त दादा तनपुरे आमदार लहु कानडे यांना दिलेल्या निवेदनात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की अति पावसामुळे डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फळे खराब झाल्यामुळे  ती  रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांचेही नुकसान झालेले आहे असे असाताना केवळ भुसार मालाचेच पंचनामे करण्यात आले असुन आम्हाला केवळ भुसार पिकाचेच पंचनामे करण्याचे आदेश असल्याचे अधिकार्यांनी सांगीतल्यामुळे फळबाग उत्पादकांनी नामदार प्राजक्त दादा तनपुरे व आमदार लहु कानडे यांच्याकडे दाद मागीतली आहे शासनाने फळबाग शेतकऱ्यानाही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला असताना राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यावरच अन्याय का असा सवालही फळबाग उत्पादक रविंद्र खटोड देविदास देसाई नारायण जाधव दिलीप जाधव सुभाष दाते महेबुब शेख दिपक पांढरे सतीश देठे नबाजी जगताप लक्ष्मण चव्हाण वसंत लोखंडे अशोक टाकसाळ रोहीदासा खपके संजय जगताप आदिसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलडाणा - 25 ओक्टोबर

पिढीजात शत्रू असलेल्या एका सापाला बेंडकाने कडवी झुंज देत सापाला शह देऊन आज विजयादशमीचा खरा विजयोत्सव साजरा केल्याचा प्रकार सुंदरखेड भागातील शिव शंकरनगरात समोर आला आहे.

     सत्यावर विजय म्हणजेच दसरा ! अन्यायाचा कडाडून विरोध करणे, अस्तित्वावर गदा आली तर प्राणाची बाजी लावणे, असे दृढ निश्चिय माणसेच नाही तर वन्यजीव देखील करतात.याचा प्रत्यय आज विजयादशमीला दुपारी १ वाजता बुलडाणा शाहराला लागून असलेल्या सुंदरखेडच्या नव्या परीसरात अयान आरो केंद्राजवळ पाहायला मिळाला. शत्रूलाही शुभेच्छा देण्याची आपली प्रथा असली तरी, बेडकाचा पारंपारीक शत्रू असलेला एक साप अयान आरो प्लॉन्ट जवळ एका नाल्यात बेंडकावर फुत्कारत असतांना,बेंडकानेही अस्तित्व पणाला लावत जगण्या- मरण्याचा संघर्ष केला. जवळपास अर्धा तासानंतर बेंडकाने लढत देत सापाला पराजित करुन विजयोत्सव साजरा केल्याचे बघ्यांनी अनुभूती घेतली. या निमित्ताने सत्याचा विजय निश्चितच होतो, हे पून्हा सिद्ध झाले आहे.


बुलडाणा - 25 ओक्टोबर

विजयदशमीच्या दिवशी सकाळी एका निर्दयी आईने एका दिवसाच्या बाळाला फेकून दिल्याची घटनेने संपूर्ण गांव हादरुन गेला आहे.

     बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे पुरुष जातीचे एक दिवसाचे अर्भक आज 25 ओक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास काही महिलांना दिसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या महिलांनी अर्भक जिवंत असल्याची खात्री करत तात्काळ त्याला उचलून बुलडाणा ग्रामीण पोलिसांना संपर्क केला.ग्रामीण पोलिसाच्या पथकातील पीएसआई रामपुरे, बिटजमादार तायडे यांनी पोहोचुन पंचनामा करुण बाळाला ताबडतोब बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात


उपचारार्थ दाखल केले.हा बाळ कोणाचा आहे याची पोलिसाने माहिती काढली आहे. या प्रकरणी पोलिस पाटिल रवि प्रल्हाद गवई यांच्या तक्रारीवर बुलडाणा ग्रामीण ठाण्यात आई विरुद्ध भादवी ची कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आईला सुद्धा उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. आई व बाळाची प्रकृती ठिक असल्याचे समजते.पुढील तपास थाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बिटजमादार तायडे करत आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) सरकारने भारतातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना इन्कम टॅक्स रिटर्न (दोन लाखापेक्षा अधीक)बंधनकारक करून एक प्रकारची जाचक अट लावली आहे.इस्लाम धर्मियांमध्ये हज करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक किमान एकवेळ तरी हज यात्रा व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात त्यासाठीच शेतमजूर,मोलमजुरी, शेतकरी इतरांच्या घरातील धुनी भांडी यासारखे छोटे मोठे काम करणारे सर्वसामान्य लोक सुद्धा हज यात्रेच्या अपेक्षेने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून थोडे फार पैसे वाचवून त्या पैशातून हज यात्रा करण्याचा मानस ठेवतात त्यामुळे अशी सर्वसामान्य लोक इन्कम टॅक्स रिटर्न  (दोन लाखापेक्षा अधीक) भरणे कस शक्य आहे? सर्वसामान्य लोकांचे हज चे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदर अट रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोहेल शेख (दारूवाला) यांनी केली

बेलापुर  (प्रतिनिधी  )- विविध गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेल्या गुन्हेगाराच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ती गाडी व गावठी कट्टा पोलीसाच्या ताब्यात मिळाला असुन ती गाडी पोलीस स्टेशनला आणणार्या व्यक्ती विरुध्द आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न  ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांना मागे घ्यावा लागला. या बाबत समजलेली माहीती अशी की पोलीसांना खंडणी मारामारी दहशत पसरविणे धमकावणे अशा वेगवेगळ्या  गुन्ह्यात हवा असणारा गुन्हेगार  आकाश अशोक बेग उर्फ टिप्या बेग याच्या गाडीचा श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर असणार्या मोसंबी बागेजवळ अपघात झाला त्या वेळी दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या वेळी दोन्ही गाडी चालकांची आपापसात समेट झाली

त्यामुळे कुणीही पोलीसांकडे तक्रार दाखल केली नाही दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त गाड्या दुरुस्तीसाठी आणत असतानाच एक गाडी गुन्हेगार टिप्या बेग याची असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीराट यांना समजली त्यांनी तातडीने ती गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्या वेळी बेलापुरातील नितीन शर्मा हा ती गाडी घेवुन येत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी गाडीत गावठी कट्टा आढळला त्यामुळे पोलीसांनी नितीन शर्मा याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली हे भाजपाचे कार्यकर्ते सुनिल मुथा यांना समजताच त्यांनी ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली नितिम शर्मा हा केवळ अपघातग्रस्त गाडी आणत होता त्यामुळे त्याचेवर खोटा गुन्हा दाखल करु नका नाहीतर गाव बंद ठेवु रस्ता रोको करु असा ईशारा देण्यात आला भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते व सुनिल मुथा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधुन खोटा गुन्हा दाखल करु नये

अशी मागणी केली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याशी चर्चा केली व नितीन शर्मा याचा जबाब घेवुन सोडून देणार असल्याचे सांगितले त्यामुळे सुनिल मुथा व प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणारे आंदोलन स्थगीत करण्यात आले त्या नंतर पत्रकाराशी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यास पाठीशी घालण्याचा कुणीही प्रयत्न करु नये आकाश बेग उर्फ टिप्या बेगवर  वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने तातडीने ती (एम एच ०२ ऐ पी ९२१६ )गाडी ताब्यात घेवुन झडती घेतली असता गाडीत तीन राऊंड व एक गावठी कट्टा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे फरार झालेल्या गुन्हेगाराचा शोध सुरु असुन लवकरच त्याला अटक करु असा विश्वासही पोलीस निरीक्षक बहीरट यांनी व्यक्त केला. 

 


बुलडाणा - 23 ऑक्टोबर

गुंडाचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात प्रथमच भेट देताच ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले. मीना यांनी येथे दाखल होत प्रलंबित गुन्ह्यां विषयी आढावा बैठक घेऊन  जिल्ह्यातील 33 पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून पारदर्शीपणे कामकाज करण्याच्या सुचना दिल्या.पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना हे बुलडाणा शहरात येत असल्याने विशेष उपाययोजना करीत शहरातील 2 नंबरचे धंदे म्हणजे ठिकठिकाणी थाठलेले वरली मटक्याचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

    अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात दाखल होत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. विशेषतः खून, बलात्कार, महिला अत्याचार, चोरी, घरफोडी आदी घटनांसंदर्भात त्यांनी माहीती जाणून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

     आगामी नवरात्रोत्सव,ईदए मिलाद या सण उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, व शांतता अबाधित राहावी या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना पारदर्शीपणे काम काज करावे असे आवाहन केले. दरम्यान नवनिर्माणाधिन पोलीस कर्मचाऱ्यांच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी देखील केली. तत्पूर्वी उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले असता, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,हेमराज राजपूत,रमेश बरकते, प्रिया ढाकणे, नलावडे, कोळी, विलास यामावर आदी डीवायएसपी, प्रभारी गृह पोलिस उपअधिक्षक बळीराम गिते, बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह जिल्ह्यातील 33 पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 


बलडाणा - 23 ऑक्टोबर

नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून व मोठ्या वाहनातून इतर दोन लहान वाहनात दारूचे बॉक्स क्रॉसिंग करताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 16 सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले होते.या तीन्ही वाहनांना बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावुन त्याची चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देण्यात आली होती.ही तिन्ही वाहन बुलडाणा न्यायालयच्या आदेशाने काल रात्री सोडण्यात आले आहे.

     य्या बाबत अधिक अशे की,एका आयशर वाहन देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन नागपूरहुन औरंगाबादकडे निघाला होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर-अमरावती-अकोला-खामगाव-चिखली-जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलडाणाच्या दिशेने निघाला व बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठे आयशर वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात असताना त्या ठीकाणी बुलडाणा एलसीबीच्या पथकाने धडक देऊन वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहन चालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे व अनाधिकृतपणे दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले होते.हे प्रकरण राजयउत्पादन शुल्क विभाग बुलडाणा यांना देण्यात आले मात्र बिल्टी औरंगाबादची असल्याने प्रकरण औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाला वर्ग करण्यात आले.या प्रकारणाची चौकशी आयुक्त मुंबई यांच्या कड़े सुरु असून तिन्ही वाहन व दारू आपल्या ताब्यात द्यावी अशी दाद मे निर्मल ट्रेडर्स,सांवगी, औरंगाबाद यांच्या कडून बुलडाणा न्यायालयात मागण्यात आली असता सदर दारुचे तिन्ही वाहन सुपर्दनाम्यावर सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिल्याने 22 ओक्टोबरच्या रात्री तिन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठण्यातून तब्बल 36 दिवसानंतर सोडण्यात आले आहे.


बुलडाणा - 22 ओक्टोबर

बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला येथील नारायण भाऊराव जोशी यांची शेती गावातीलच शालिकराम तोताराम उबरहंडे यांनी बटाईने केली होती.या शेतात त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगुन त्याची सोडी लावण्यात आली होते. 21 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर सोयाबीन सुडीला आग लावून दिली यात शेतकऱ्याचे 90 क्विंटल सोयाबीन किंमत अंदाजे 4 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी शालिकराम तोताराम उबरहंडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - ऑक्टोबर 

शहरातील रामनगर भागातील रहिवासी 36 वर्षीय व्यक्तिने आपल्या राहत्या घरच्या वरील मजल्यावर एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घड़ली. मृतकाचे नाव आशिष सुरेश शेळके असे आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर ठाण्याचे पीएसआई विनीत घाटोळ आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण मृतदेहला जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवला आहे.शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील पोलिस करत आहे.

बुलडाणा - 22 ऑक्टोबर

बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार तसेच मध्यप्रदेश होऊन वाळू बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयच्या पथकाने मलकापूर मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ एका वजन काट्यावर  उभा असलेला मोठा ट्रक क्र MH 28 AB 9282 याची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील नर्मदा नदीतील  वाळू दिसून आली.ट्रक चालकाकडून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक बुलडाणा तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे. पुढील तपास बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार अमरसिंह पवार करीत आहे.

मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने आज दिनांक २२/१०/२०२० रोजी दुपारी १६.०० वाजेचे सुमारास श्रीरामपुर गावात बेलापुर ते पुणे रोडाचे बाजुला अनारसे हॉस्पीटल चे समोर दुर्गा सोलर अॅण्ड आर.ओ हाऊस दुकानाचे शेजारी एका पत्र्याचे दुकानात अंकसंटा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे एकुन ०६ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असुन त्यांचे कडुन सुमारे ११७८०/- रुपये रोख व जुगाराची साधने मिळुन आले असुन सदर छाप्याची कारवाई करुन आरोपीतांना पोलीस ठाणे येथे घेवुन जात असतांना पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांनी पुन्हा श्रीरामपुर गावात शिवाजी चौकात चंद्रकांत भेळ वाल्याशेजारी असलेल्या पत्र्याचे टपरीचे आडोश्याला सार्व जागी १७.०० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखिल एकुन ०५ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले त्यांचे कडुन ७११०/ रुपये रोख व जुगाराची साधने मिळून आले. वरील केलेल्या कारवाई बाबत श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गु.र नं २१०६/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४/५ प्रमाणे तसेच श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुर नं २१०७/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई हो मा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सपोनि/सचिन जाधव, पोसई/संदिप पाटील, असई/राजेंद्र सोनवणे, पोना/१०५१ नितीन चंद्रकुमार सपकाळे, पोकॉ/१०६० विश्वेश हजारे, पोको १५६५ दिपक ठाकुर, पोकाँ/उमाकांत खापरे, पोकॉ/१९२१ नारायण कचरु लोहरे यांनी केली आहे.


श्रीरामपूर : श्री. किशोर गाढे यांजकडून भारतीय मिडीया फौडेशनचे महाराष्ट्र कमेटीचे चेअरमन श्री. राजेंद्र वाघ यांनी मालेगांव शहरातील लॉकडाऊनच्या काळातील झालेल्या रेशन घोटाळा प्रकरणी चौकशी करावी या मागणीकरीता मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब कार्यालय, मालेगांव या ठिकाणी दिनांक 0७/१०/२०२० व दिनांक ०८/१०/२०२० रोजी सलग दोन दिवस भारतीय मिडीया फौडेशनच्या वतीने उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेता नायब तहसिलदार श्री. वाणीसाहेब, लिपिक सावणे व पुरवठा अधिकारी यांनी दिनांक १०/१०/२०२० रोजी या चौकशीस मौजे डाबली, पोस्ट काटी, ता. मालेगांव या गावात श्री. राजेंद्र वाघ यांना चौकशी कामी समक्ष हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. याबाबतची दवंडी देवून ग्रामस्थांना हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १०/१०/२०२० रोजी सदरील अधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यांच्यासमक्ष गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या चौकशीत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या पत्नी सौ. भारती राजेंद्र वाघ व आई निर्मला एकनाथ वाघ यांना मारहाण केली. तसेच श्रीमती निर्मला वाघ यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांच्या या क्रुर कृत्याचा निषेध भारतीय मिडीया फौडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत भा.दं.वि. कलम ३५३ अन्वये कार्यवाही करावी, तसेच श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांतील लोकांना मारहाण केल्याबद्दल तसेच श्रीमती एकनाथ वाघ यांचेबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल पत्रकार संरक्षण कायद्यान्वये या गुंडांवर कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून त्यांना कलम १६९ अन्वये आरोप मुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय मिडीया फौंडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिनांक २०/१०/२०२० रोजी देण्यात आले. सदरील दोन्ही निवेदन शिरस्तेदार श्री. डी. डी. गोवर्धने यांनी स्विकारले असून तुमच्या मागण्या वरिष्ठांना कळविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. निवेदनावर श्री. शेख बरकतअली, किशोर गाढे, अमीरभाई जहागिरदार, अस्लम बिनसाद, शेख फकीर महंमद, रमेश शिरसाठ, शब्बीरभाई कुरेशी, गुलाबभाई वायरमन, सचिन केदारी, गणेश ताकपिरे, अक्रम कुरेशी, अयाजअली शाह बाबा आदि पत्रकारांच्या सह्या आहेत.


बुलडाणा - 21 ऑक्टोबर

बुलडाणा तालुक्यातील सैलानी जवळ एका शेतातुन जात असताना 15 ते 20 मोकाट कुत्र्यानी एका 9 वर्षीय मुलावर हल्ला चढविला व त्याचे लचके तोडत असताना त्यांने आरडाओरड केली ते ऐकून आई धावत आली असता आईवर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केला. यात 9 वर्षे मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झालेली आहे.ही घटना 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उंबरखेड़ शिवारात घडली आहे.

   


 लातूर जिल्ह्यातील धर्मापुर येथील शेख तस्लीम मागील काही काळापासून सैलानी येथे आपल्या परिवारसह राहत आहे.सद्या ते रमेश शेवाळे यांच्या शेतात राहतात.आज 21 ओक्टोबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 9 वर्षीय मुलगा शेख अरमान काही किराणा सामान आणण्यासाठी सैलानी कडे जात असताना अचानकपणे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले, आरडाओरड ऐकून त्याची आई नसीम बी बचावासाठी धावत गेली असता त्याच्यावर ही कुत्र्यांनी हल्ला केला यात तीही गंभीर जखमी झाली. त्याच्या मदतीला काही लोक धावत आले तेव्हा कुत्रे पळून गेले. गावातील लोकांनी त्यांना उचलून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरने शेख अरमान याला मृत घोषित केले तर आई नसीम बी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताची शान जगात उंचावण्याचे कार्य केले. भारताला बलशाली बनवताना त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. त्यांचे अग्निपंख हे पुस्तक मी दोनदा वाचले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कष्ट करून नावलौकिक प्राप्त केला. त्यांचे कार्य भारतातील सर्वांसाठी व येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे. वाचन प्रेरणा दिनापासून प्रेरणा घेऊन उर्दू शाळेने आयोजित केलेला आजचा सोहळा प्रशंसनीय आहे. सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेसाठी मोठे कार्य केले आहे. या थोर विभूतींचे स्मरण सतत होणे आवश्यक आहे असे अनमोल विचार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी व्यक्त केले .

परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा नंबर पाच मध्ये थोर समाजसुधारक सर सय्यद अहमद खान व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वितरण व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पटारे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण हे होते.व्यासपीठावर समाजसेवक कलीम कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश सचिव सोहेल बारूदवाला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड.समीन बागवान, शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर एहतेशाम शेख, इम्तियाज खान, बिलालशहा, हारुन शाह आदी उपस्थित होते .

आपल्या प्रमुख भाषणात पटारे यांनी शाळेच्या प्रगतीचे मुक्तकंठाने कौतुक करून प्रत्यक्षपणे जयंती सोहळा साजरा करून शाळेने समाजासमोर एक उदाहरण घालून दिल्याचे सांगितले . यावेळी बोलताना उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदत शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.ॲड.समीन बागवान व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण  यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . 

याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कथा व उतारा वाचन केले . शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना इक्रा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले . तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या ताहेरा अतहरहसन रिजवी, फरहान बिलाल शाह व अल्फिया हारून शाह यांचा भेटवस्तू देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .शाळेला नेहमी सहकार्य करणारे सोहेल बारूदवाला यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सचिवपदी नियुक्तीबद्दल  व  ॲड. समीन बागवान यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .शाळेच्या शिक्षिका शाहीन शेख यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तसेच मोहम्मद आसिफ यांनी सर सैय्यद अहमदखान यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये लॉक डाऊनच्या काळात शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली .पालक व विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास खूप आतुर आहेत .परंतु शासनाच्या आदेशाशिवाय नियमित शाळा सुरू करता येत नाही असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ यांनी केले तर आभार फारुक शाह यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, जमील काकर, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख,बशीरा पठाण,मिनाज शेख, एजाज चौधरी, सदफ शेख, रिजवाना कुरेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले .


बुलडाणा - 21 ओक्टोबर

बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथे कार्यरत तलाठी संजय जगताप यांनी महसला तलाठी कार्यालयात कार्यरत कोतवाल योगेश सपकाळ यालाच नव्हे तर सर्व कोतवालांना आई,बहिनी व बायका वरुण अश्लिल भाषेत मोबाइलवर शिवीगाळ केली तसेच विदर्भवाद्या हो आत्महत्या करने तुमच्या नशीबी आहे,,आत्महत्या करा,पंचनामा करुण तुम्हाला 1 लाख देऊ, अशी मागरूरीचा भाषा करणाऱ्या तलाठी  संजय जगतापला आखेर निलंबित करण्यात आले आहे.

    17 ओक्टोबर रोजी तलाठी संजय जगताप याने फोनवार दारुच्या नशेत सर्वच कोटवालांना अश्लील शिवीगाळ केली होती.या घटनेला निंदनीय सांगत हा प्रकार थांबला पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा बुलडाणाच्या वतीने जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन 19 ऑक्टोबरला बुलडाणा तहसील कार्यालयात प्रदर्शन करुण आपली मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.निवेदनात तलाठी संजय जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.या गोष्टीला तहसीलदार रूपेश खंडारे यांनी गंभीरतेने घेऊन तात्काळ तलाठी संजय जगतापला निलंबित करण्यासाठी प्रस्ताव तैयार करुण उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांना पाठविल असता उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी तलाठी संजय जगतापला शासकीय कर्तव्यात कसूर व गैरवर्तन केल्याने एका आदेशाने निलंबित केले आहे.


बुलडाणा - 18 ऑक्टोबर

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जलसंधारणाच्या “बुलढाणा पॅटर्न'ला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे आणि निती आयोग यावर आधारित राष्ट्रीय धोरणाची आखणी करत असल्याच्या माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची संकल्पना देशभर पोहोचली आहे.

      महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनासाठी सदर पॅटर्नचा अवलंब करावा असे आवाहन नितिन गडकरी यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच जलमार्ग नाले आणि नदी यांच्या खोलीकरणाच्या कामांमध्ये निघालेल्या मातीचा वापर करून राष्ट्रीय महामार्गचे बाधकाम आणि जलसंवर्धन यांच्या कामाचा समन्वय साधला गेला

आहे. परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये पाणी साठवणुकीची क्षमता वाढली

आणि हे बुलढाणा पॅटर्न म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले. जलस्त्रोतांच्या खोलीकरणांच्या कामामध्ये मुरुम, माती व आवश्यक दगड हे वापरल्या गेली परिणामी राज्य सरकारला कुठलाही खर्च न होता सुमारे 22,500 टी.एम.सी. एवढी पाणीसाठवण क्षमतेत वाढ झाली, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नमुद केले आहे.

     बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या कल्पक विचाराने बुलडाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात पहिल्यांदा पैनगंगा नदी व इतर लहान तलावांचे खोलिकरण करुण निघालेले मुरुम मागच्या कामात उपयोगी आणला गेला होता.शासन हिताची ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना आवडली व त्यांनी महाराष्ट्र सह देशातील इतर राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात याला आमलात आनायचे सूचना दिल्या आहे.


बुलडाणा - 16 ऑक्टोबरबु

लडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सफाई कामगार या पदा कार्यरत कैलास बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत मा. राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

         देशासह संपूर्ण जगासमोर कोरोना महामारी मुळे मोठे संकट उभे आहे.अशा वेळी अनेक लोक कोरोना योद्धा म्हणून समाजात काम करीत आहेत. यामध्ये रुग्णालयात काम करून आपली सेवा देणाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे.या कोवीड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राजभवन,मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.मागील 33 वर्षापासून सफाई कर्मचारी पदावर काम करीत आपली अविरत सेवा देत या कोरोना काळात ही कैलाश बेंडवाल यांनी उत्कृष्ट काम करून इतर कर्मचाऱ्या कडून ही नियोजन बद्धरित्या काम करून घेत आहे.अत्यंत मनमिळावू व आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या कैलाश बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मा. राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे या वेळी मंचकावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रामुख्याने उपस्तिथ होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget