बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार तसेच मध्यप्रदेश होऊन वाळू बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयच्या पथकाने मलकापूर मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ एका वजन काट्यावर उभा असलेला मोठा ट्रक क्र MH 28 AB 9282 याची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील नर्मदा नदीतील वाळू दिसून आली.ट्रक चालकाकडून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक बुलडाणा तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे. पुढील तपास बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार अमरसिंह पवार करीत आहे.
मध्यप्रदेशहून आलेली वाळूचा ट्रक बुलडाणा तहसीलच्या पथकाने पकडले.
बुलडाणा - 22 ऑक्टोबर
Post a Comment