मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने आज दिनांक २२/१०/२०२० रोजी दुपारी १६.०० वाजेचे सुमारास श्रीरामपुर गावात बेलापुर ते पुणे रोडाचे बाजुला अनारसे हॉस्पीटल चे समोर दुर्गा सोलर अॅण्ड आर.ओ हाऊस दुकानाचे शेजारी एका पत्र्याचे दुकानात अंकसंटा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे एकुन ०६ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असुन त्यांचे कडुन सुमारे ११७८०/- रुपये रोख व जुगाराची साधने मिळुन आले असुन सदर छाप्याची कारवाई करुन आरोपीतांना पोलीस ठाणे येथे घेवुन जात असतांना पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांनी पुन्हा श्रीरामपुर गावात शिवाजी चौकात चंद्रकांत भेळ वाल्याशेजारी असलेल्या पत्र्याचे टपरीचे आडोश्याला सार्व जागी १७.०० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखिल एकुन ०५ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले त्यांचे कडुन ७११०/ रुपये रोख व जुगाराची साधने मिळून आले. वरील केलेल्या कारवाई बाबत श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गु.र नं २१०६/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४/५ प्रमाणे तसेच श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुर नं २१०७/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई हो मा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सपोनि/सचिन जाधव, पोसई/संदिप पाटील, असई/राजेंद्र सोनवणे, पोना/१०५१ नितीन चंद्रकुमार सपकाळे, पोकॉ/१०६० विश्वेश हजारे, पोको १५६५ दिपक ठाकुर, पोकाँ/उमाकांत खापरे, पोकॉ/१९२१ नारायण कचरु लोहरे यांनी केली आहे.
Post a Comment